पुणे, दि. ११ : सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली असून प्रवेश अर्ज ३० जून २०२५ पर्यत स्विकारण्यात येतील. तरी सर्व युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक, सैनिकांची अनाथ पाल्ये यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ले.कर्नल हंगे स. दै. निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक शेख अब्दुल मो.नं. ७०२०४१०९५४ व वसतिगृह अधिक्षिका कांचन नवगिरे मो.नं. ७७७६८०५८२४ वर संपर्क साधावा, असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
00000


