राष्ट्रीय, 11 जून 2025 : आल्पेनलिबे इक्लेयर्स ही तिच्या समृद्ध, चोको सारखे लिक्विड ने भरलेल्या स्वादासाठी ओळखली जाते आणि अनेक वर्षांपासून ती ग्राहकांची आवडती राहिली आहे. या खास आणि लोकप्रिय चवेला पुढे नेत, आल्पेनलिबे आता घेऊन आली आहे एक नवे रूप, आल्पेनलिबे इक्लेयर्स पॉप, भारतातील पहिली लॉलीपॉप ज्यामध्ये आहे चोको सारख्या लिक्विड भरलेलं.
केवळ ₹5 मध्ये मिळणारी इक्लेयर्स पॉप एक खास स्वादानुभव देते, बाहेरून मऊ आणि चवदार कैरेमलचा थर आणि आतमध्ये गोडसर, वाहणारा चोको सारखा लिक्विड फिलिंग. ही लज्जतदार ट्रीट आता अधिक सोयीस्कर आणि सहज खाण्यासारख्या रूपात सादर करण्यात आली आहे, विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांसाठी, जे कोणत्याही वेळी, कुठेही आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू इच्छितात. हळूहळू चव घेतली तरी वा एकदम खाल्ली तरीही इक्लेयर्स पॉप नेहमीच्या स्नॅक्सला एका गोड चोको सारख्या आनंदात बदलतो.
परफेटी व्हॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर गुंजन खेतान म्हणतात, “आल्पेनलिबे इक्लेयर्स पॉपच्या माध्यमातून आमचा उद्देश म्हणजे लोकांना आवडलेला अनुभव आता एका नव्या आणि अधिक सोयीस्कर रूपात देणे. इक्लेयर्सच्या चोको सारख्या फिलिंग ला ग्राहकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे आणि हा नवीन प्रॉडक्ट त्याच आनंददायक अनुभवाला पुढे नेतो. आजचे किशोरवयीन आणि तरुण वर्ग अधिक समृद्ध आणि रंगतदार ट्रीटच्या शोधात असतात, अगदी रोजच्या खाण्याच्या गोष्टींमध्येही आणि इक्लेयर्स पॉप हाच अनुभव देतो. हे काही वेगळं प्रयोगात्मक रूप नाही, तर त्यांनी आधीपासूनच ज्या चविला दाद दिली आहे, त्याचं एक नैसर्गिक पुढचं पाऊल आहे.”
***


