Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन तर्फे अद्ययावत एनएक्स टिथर सॉफ्टवेअर

निकॉन तर्फे अद्ययावत एनएक्स टिथर सॉफ्टवेअर

पुणे, ९ फेब्रुवारी २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे एनएक्स टिथर सॉफ्टवेअरचे 2.0.0 हे नवीन व्हर्जन सादर करण्यात आले आहे. यामध्ये फोटो आणि व्हिडिओ-टिथर्ड शूटिंग या दोन्हीसाठी बहुप्रतीक्षित आणि अत्यंत मागणी असलेल्या लाइव्ह व्ह्यू मॉनिटर या वैशिष्ट्याचा समावेश आहे. या नवीन वैशिष्ट्यासह, वापरकर्ते आता चिंतामुक्त, अखंड शूटिंग अनुभव मिळवू शकतात. एनएक्स टिथर व्हर्जन 2.0.0 च्या मुख्य वैशिष्यांमध्ये रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी न्यू लाईव्ह व्हियू स्क्रीन, व्यावसायिक आणि हौशी लोकांसाठी उत्कृष्ट टिथर्ड शूटिंग ऑफर, पूर्ण सुसंगततेसह टिथर्ड शूटिंग सीन आणि कार्यक्षम कार्यप्रवाहासाठी फ्लेक्सिबल विंडो अरेंजमेंट आणि सिम्पल डिझाइन यांचा समावेश आहे. एनएक्स टिथर व्हर्जन 2.0.0 सॉफ्टवेअर 7 फेब्रुवारी 2024 पासून निकॉन डाउनलोड सेंटर वर उपलब्ध करून दिले गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments