Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे युनिट क्र.1 व युनिट क्र.3 विद्यार्थ्यांसाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल पी. बी. सुतार यांनी केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहामध्ये प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य निवासाची व्यवस्था, अंथरुण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, तसेच दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी, पुणे येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments