प्रत्येकी 10 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 77 रुपये ते 82 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· बोली/ऑफर बुधवार, 25 जून 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 27 जून 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 24 जून 2025 असेल
· बोली किमान 182 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 182 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
राष्ट्रीय, 20 जून 2025: संभव स्टील ट्यूब्स लिमिटेड (“संभव” किंवा “कंपनी”) ची इक्विटी शेअरसाठीच्या संदर्भातील प्राथमिक समभाग विक्री (IPO) बुधवार, 25 जून 2025 रोजी बिड / ऑफरसाठी खुली होणार आहे.
एकूण ऑफर साईज मध्ये 5400 दशलक्ष रु. [540 कोटी रु.] किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये विक्री समभागधारकांकडून 4,400 दशलक्ष रु. [440 कोटी रु.] पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 1,000 दशलक्ष रु. [100 कोटी रु.] मूल्याच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. (“एकूण ऑफर साईज”)
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 24 जून 2025 असेल. बिड / ऑफर बुधवार, 25 जून 2025 रोजी खुली होऊन शुक्रवार, 27 जून 2025 रोजी बंद होईल.
ऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअरसाठी 77 रु. ते 82 रु. निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 182 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 182 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी कंपनीच्या काही थकबाकी कर्जाची पूर्ण किंवा नियोजित परतफेडीसाठी आणि उर्वरित निधी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरणार आहे (“Object of Issue”).
ऑफर फॉर सेलमध्ये शशांक गोयल (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्या द्वारे 100.00 दशलक्ष रु. पर्यंत (10 कोटी रु.) , रोहित गोयल (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्या द्वारे 100.00 दशलक्ष रु. पर्यंत (10 कोटी रु.) , कौशल्या गोयल (“प्रवर्तक समुह विक्री समभागधारक”) यांच्या द्वारे 350.00 दशलक्ष रु. पर्यंत (35 कोटी रु.), हर्षित गोयल (“प्रवर्तक समूह विक्री समभागधारक”) यांच्या द्वारे 100.00 दशलक्ष रु. पर्यंत (10 कोटी रु.) आणि रिंकू गोयल (“इतर विक्री समभागधारक”) यांच्या द्वारे 350.00 दशलक्ष रु. पर्यंत (35 कोटी रु.) (एकत्रितपणे, “विक्री शेअरधारक”) शेअरधारकांकडून इक्विटी शेअर्स समावेश आहे
कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना 4 रु. प्रति इक्विटी शेअर इतकी सवलत दिली जात आहे.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक जून …., 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (“RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित 2018 नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35 % पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.
येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्र. 525 वरील “ऑफर प्रक्रिया” (Offer Procedure) पाहा.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.


