Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक न्याय दिनानिमित्त संविधान जनजागृती व समता दिंडीचे आयोजन

सामाजिक न्याय दिनानिमित्त संविधान जनजागृती व समता दिंडीचे आयोजन

पुणे दि.25:- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत संविधान जनजागृती व समता दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

 

या संविधान जनजागृती व समता दिंडीची सुरूवात राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथे समारोप होणार आहे.

 

 

 

जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, समाज कल्याण विभागाचे वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिक, पारलिंगी नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments