Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक न्याय दिनानिमित्त संविधान जनजागृती व समता दिंडी संपन्न

सामाजिक न्याय दिनानिमित्त संविधान जनजागृती व समता दिंडी संपन्न

पुणे, दि. 25 : सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालय आणि श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती यांच्यावतीने पुणे शहरात संविधान जनजागृती प्रभातफेरी व समता दिंडीचे आयोजित करण्यात आली, या कार्यक्रमास नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

 

या संविधान जनजागृती प्रभातफेरी व समता दिंडीची सुरूवात राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा येथे समारोप करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच संविधान प्रास्ताविकांचे सामूहिक वाचन करण्यात आले.

 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, समाज कल्याण विभागाचे वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments