Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपनवेल महानगरपालिकेची प्रगतीशील पनवेल भव्य -दिव्य लघूपट स्पर्धा* *3.75 लाख रूपयांची...

पनवेल महानगरपालिकेची प्रगतीशील पनवेल भव्य -दिव्य लघूपट स्पर्धा* *3.75 लाख रूपयांची रोख पारितोषिके*

 

 

पनवेल.दि27: पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून ‘प्रगतीशील पनवेल’ ही भव्य दिव्य अशी लघूपट स्पर्धा ( शॉर्ट फिल्म) महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आली आहे.

 

आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसनशील विकासात्मक प्रगतीशील अशी पनवेल महानगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासुन पनवेल महानगरपालिका आपल्या दशकपूर्ती वर्षात पदार्पण करीत आहे. मनपाचा गत नऊ वर्षांच्या कालावधीत विविध विकास कामे केली आहेत. त्याच संदर्भात ही लघूपट स्पर्धा जाहिर करण्यात आली आहे.

 

अटी शर्ती

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. लघुपटाचा कालावधी दहा ते पंधरा मिनिटे एवढाच असेल. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील लघुपट पात्र असतील. मात्र ‘प्रगतीशील पनवेल’ हा विषय केंद्रभागी असणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी shortfilmpmc@gmail.com या ईमेल आयडी वरती नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नंतर संबंधितांना स्पर्धेच्या सविस्तर अटी शर्ती बाबत माहिती दिली जाईल.

 

पारितोषिके

स्पर्धेसाठी एकुण 20 पारितोषिके देण्यात येणार असून त्यांची रोख रक्कम तीन लाख 75 हजार एवढी आहे. यात सर्वोकृष्ट लघूपटास 1 लाख रूपये रोख, प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह असे पारितोषिक असणार आहे. तर द्वितीय लघूपटास 75 हजार रूपये रोख, प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह, तृतीय लघूपटास 50 हजार रूपये रोख, प्रशस्तीपत्रक सन्मान चिन्ह व उत्तेजनार्थ 2 लघूपटास प्रत्येकी 25 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या शिवाय 5 लघूपटांना प्रत्येकी 10 हजार तर 10 लघूपटांना प्रत्येकी स्पर्धेसाठी 5 हजार विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय दशकपूर्तीनिमित्त दहा पारितोषिके असणार आहेत.

 

चौकट

लघूपट स्पर्धेसाठी 15 जुलै पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता shortfilmpmc@gmail.com या ईमेल आयडी वर तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर 9892108365 या क्रमांकावर दुपारी दोन ते चार या वेळेतच संपर्क साधावा.

या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

……..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments