पुणे, 26 जून, 2025:
संजय घोडावत ग्रुपची पुण्यातील शिक्षण संस्था असलेल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे भारतातील सर्वात पहिले प्रत्यक्ष एएफएस ग्लोबल स्टेम इनोव्हेटर्स कोहर्ट यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. ही परिषद २१ ते २४ जून २०२५ दरम्यान एएफएस इंटरकल्चरल प्रोग्राम्स इंडियाच्या सहकार्याने पार पडली. संपूर्ण भारतातील १५ शाळांतील १०० हुन अधिक विद्यार्थी विचार, नवकल्पना आणि सांस्कृतिक देवाण- घेवाण करण्यासाठी एकत्रित आले होते , हा कार्यक्रम “ बी द व्हॉइस फॉर बेटर टुमारो ” या कल्पनेवर केंद्रित होता.
ही चार दिवसांची परिषद एसजीआयएस आणि एएफएस दोघांसाठीही एक महत्त्वाचा टप्पा ठरली. उद्घाटन झालेल्या पहिल्या परिषदेमध्ये स्टेम शिक्षण आणि युएन शाश्वत विकास उद्दिष्टे यावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करता आला. एसजीआयएस च्या निसर्गरम्य टेकडीवरील कॅम्पसमध्ये आयोजित केलेली ही परिषद शिक्षण, संघ-बांधणी आणि सांस्कृतिक उत्सवाचे मिश्रण होती.
७०% विद्यार्थिनींचा सहभाग असलेलली ही परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानात तरुण महिलांची वाढता सहभाग आणि नेतृत्व दर्शविते. चार दिवसांमध्ये, सहभागींनी महत्वपूर्ण जागतिक मुद्यांवर चर्चा करत शाश्वत उपाय प्रस्तावित के
ले.


