पुणे, दि. २८: दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असो. यांची दि. २५/०६/२०२५ रोजी सभा झाली असून त्यांच्या पत्रानुसार पुणे वाहतूक नियंत्रण शाखा यांचेकडून पुणे शहराच्या बाजार पेठेत म्हणजेच नानापेठ, भवानीपेठ, गणेशपेठ व मार्केट यार्ड येथे जिवनावश्यक वस्तूंचा माल घेऊन येणाऱ्या वाहनांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याने वाहतूकदार संघटनेने अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले व औषध यांची वाहतूक करणारी वाहने बेमुदत बंद ठेवणार असल्याचे दि पूना डिस्टीक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असो. यांनी पत्राद्वारे कळवीले आहे.
गेल्या काही दिवसात वाहतुकीचे निर्बंध लागू केल्यामुळे पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाला असून सदर वस्तूंच्या टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढ होऊन त्याची झळ सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. तसेच त्याचा विपरीत परिणाम जिवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीक, हमाल कामगार व इतर घटकांवर देखील होणार आहे. सदरबाबत मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस आयुक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संबंधीतांची तातडीने बैठक बोलावून सदर विषयावर मार्ग काढावा अशी चेंबरने पत्राद्वारे मागणी केली आहे, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.


