Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमागण्या मान्य झाल्या नाही तर नामदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनाचा...

मागण्या मान्य झाल्या नाही तर नामदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा.*

 

 

*”मुंबई,

*”महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक आंदोलनामध्ये अनेक आश्वासन दिली मात्र ती आश्वासने राज्य सरकारने पूर्ण केलेली नाहीत, हा अनुभव लक्षात घेता दोन जुलै रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये सुमारे अठरा विषयांवरील मागण्यांच्या संदर्भात काही मागण्या मंजूर झालेले आहेत तर उर्वरित मागण्यांच्या संदर्भात सात विषयांवर माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित खात्याचे मंत्री वरिष्ठ मुख्य अधिकारी सचिव यांच्यात सुमारे चार/५ तास बैठक होणार आहे या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीसह दुध व ऊस  शेतमालाला एम एस पी+२०% अनुदान, हमी  भावापेक्षा कमी दराने विक्री झालेल्या शेतमाला भावांतर  योजनेतील फरक दराच्या संदर्भात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ऑगस्ट सप्टेंबर २०२५ च्या दरम्यान राज्यात तीव्र स्वरूपाचे  शेतकरी संप आंदोलन माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात २०० हून अधिक संघटना सहभागी होतील आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल, त्यामध्ये सर्व प्रकारचा शेतमाल विक्री बंद पासून  शेतकरी संप करत राज्य सरकारला धारेवर धरण्यात येणार असल्याचा इशारा देखील आंदोलनाचे निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.,,*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments