टीमवर्क आर्ट्स प्रस्तुत करत आहे जयपूर लिटरेचर फेस्टिवल २०२४चा मुंबई प्रीव्ह्यू, मुंबईतील कोरम येथे
महत्त्वाच्या विषयांची घोषणा तसेच आगामी महोत्सवातील सत्रांबद्दल माहिती
१४ डिसेंबर २०२३– प्रख्यात जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या १७व्या पर्वाबद्दल उत्कंठा वाढत चालली आहे. हा महोत्सव गुलाबी रंगाच्या गजबजलेल्या जयपूर शहरातील हॉटेल क्लार्क्स अमेर येथे १ ते ५ फेब्रुवारी २०२४ ह्या काळात होणार आहे. ह्या प्रख्यात महोत्सवाचे निर्माते टीमवर्क आर्ट्सने मुंबईतील कोरम येथे काल एका उत्सवी संध्येचे आयोजन केले होते. ह्यानिमित्ताने शहरातील मान्यवर, महोत्सवातील वक्ते आणि प्रेक्षक ह्यांना एकत्र आणले गेले. महोत्सवातर्फे २०२४ सालातील पर्वासाठी अधिकृत बुकस्टोअर म्हणून क्रॉसवर्ड बुकस्टोअर्सची घोषणा करण्यात आली.
सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या महोत्सवातील कार्यक्रम व उपक्रमांबाबत तर ह्यावेळी चर्चा झालीच. शिवाय, ह्या सोहळ्यामध्ये सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक, मुत्सद्दी आणि लंडनमधील नेहरू सेंटरचे संचालक अमीष आणि महोत्सवाचे निर्माते तसेच टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के रॉय ह्यांनी परस्परांशी संवाद साधला. स्मृतींचे माध्यम म्हणून दंतकथा कशी महत्त्वाची भूमिका बजावतात ह्यावर ह्या दोघांनी चर्चा केली. पर्क्युशनिस्ट व्लादिमिर टॅराव्होस आणि सेक्साफोनिस्ट ल्युडास मोक्युनास ह्यांनी ह्या सोहळ्यादरम्यान रोमांचक जाझ सादरीकरण केले.
लेखक, इतिहासकार तसेच महोत्सवाचे सहसंचालक विल्यम डॅलरीम्पल म्हणाले, “जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा मापदंड दरवर्षी अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोच पण २०२४ सालातील महोत्सव आजवरचा सर्वोत्तम ठरणार आहे. हा महोत्सव असामान्य होणार आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत चुकवण्याजोगा नाही!”
टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे निर्माते संजॉय के. रॉय म्हणाले, “जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये आम्ही कथाकथनाच्या शक्तीद्वारे लोकांना प्रेरणा देतो. कला, ज्ञान आणि नवोन्मेषाच्या आदानप्रदानात सहभागी होण्याची ही संधी आहे. हा अनुभव कोणीही चुकवू नये असाच आहे. साहित्यातील आनंद साजरा करणारा हा महोत्सव आहे.”
क्रॉसवर्ड बुकस्टोअर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता म्हणाले, “क्रॉसवर्डला जेएलएफचा बुकस्टोअर सहयोगी होता आले ह्याचा खूप अभिमान वाटतो. चांगल्या पुस्तकांचा आनंद आणि महत्त्व ह्या महोत्सवाद्वारे सर्वोच्च बिंदूपर्यंत साजरे केले जाते. महोत्सव आणि क्रॉसवर्ड ह्यांच्यातील हा सहयोग आमच्या सामाईक उद्दिष्टांशी तंतोतंत जुळणारा आहे. जेएलएफ २०२४ मध्ये सर्वांना नक्कीच एक रोमांचक पुस्तक अनुभव मिळेल!”
कोरममधील प्रोग्रामिंग संचालक सलोनी पुरी म्हणाल्या, “मी २००६ सालापासून म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या पहिल्या वर्षापासून महोत्सवात सहभागी होत आहे. ह्या महोत्सवातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम देशाच्या सांस्कृतिक संभाषणात मोलाची भर घालतात. कोरम आणि जयपूर लिटरेचर फेस्टिवलची जातकुळी एकच आहे. ती म्हणजे कल्पना आणि कल्पनाशक्ती, विचारांचे नेतृत्व व संभाषण ह्यांबद्दल जिज्ञासा व प्रेम. २०२४ सालातील पर्वाच्या मुंबई प्रिव्ह्यूसाठी त्यांचे सहयोगी होणे आमच्यासाठी अतीव आनंदाची बाब आहे.”
१७व्या पर्वातील साहित्य ‘कुंभमेळ्या’तील काही महत्त्वाच्या विषयांची घोषणाही ह्या संध्येदरम्यान करण्यात आली. कला व संस्कृती हे महोत्सवाचे प्रमुख विषय आहेत. ह्या विषयांशी संबंधित रोचक सत्रांचे आयोजन महोत्सवात करण्यात आले आहे. आपल्या देशातील आद्य आधुनिक कलावंत राजा रविवर्मा ह्यांच्या कलेतील अलौकिकता उलगडणाऱ्या सत्राचा ह्यामध्ये समावेश आहे. गणेश व्ही. शिवस्वामी ह्यांच्या राजा रवि वर्मा: अॅन एव्हरलास्टिंग इम्प्रिण्ट ह्या सहा खंडांच्या मालिकेतील दोन खंडांच्या माध्यमातून राजा रवि वर्मा ह्यांचे आयुष्य, कलात्मक शैली आणि त्यांच्या सर्जनशील प्रवासाची कायमस्वरूपी छाप ह्यांचा वेध घेतला जाणार आहे. आणखी एका सत्रामध्ये, म्युझियम क्युरेटर, कला इतिहासकार आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील फिट्झविल्यम म्युझियमचे संचालक ल्युक सायसन लिओनार्दो दा विंची ह्यांच्या एक शोधक व शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या लौकिकाबद्दल तसेच एक चित्रकार म्हणून असलेल्या त्यांच्या ध्येयांचे व तंत्रांचे महत्त्वही काहीवेळा झाकोळून टाकणाऱ्या सर्जनशीलता व व्यक्तिमत्वांतील जटीलतेबद्दल बोलणार आहेत. लिओनार्दो दा विंची- पेण्टर अॅट द कोर्ट ऑफ मिलान हे सायसन ह्यांचे प्रशंसाप्राप्त पुस्तक, रेनेसाँ काळातील सर्वाधिक लोकप्रिय कलावंतांपैकी एक असलेल्या लिओनार्दो ह्यांचा जटील स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
चरित्रे ह्या विषयामध्ये, इर्रफान: ए लाइफ इन मुव्हीज ह्या चित्रपट समीक्षक व लेखक शुभ्रा गुप्ता ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरील सत्राचा, समावेश आहे. ह्या दिवंगत अभिनेत्याच्या समकालीन कलावंतांशी झालेल्या संभाषणांचा तसेच त्यांनी सांगितलेल्या इर्रफान ह्यांच्या आठवणींचा संग्रह ह्या पुस्तकात आहे. इर्रफान खान ह्यांच्या पत्नी व रंगभूमीवरील कलावंत सुतपा सिकदर आणि चित्रपटकर्ते विशाल भारद्वाज ह्यांच्याशीही ह्या सत्रादरम्यान संवाद साधला जाणार आहे. इर्रफान ह्यांची कला, कौशल्य आणि आयुष्य ह्यांवर ह्या सत्रात चर्चा होणार आहे.
आणखी एका सत्रामध्ये, पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक काइ बर्ड त्यांच्या लेखक म्हणून जगलेल्या आयुष्यावर तसेच साहित्यिक प्रवासावर बोलणार आहेत. दिवंगत मार्टिन जे. शेरविन ह्यांच्यासोबत सहलेखक म्हणून काम केलेल्या बर्ड ह्यांनी अमेरिकन प्रोमेथिअल- द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपनहायमर हे पुस्तक लिहिले आहे. त्यावरूनच प्रेरणा घेऊन दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान ह्यांनी ओपनहायमर हा चित्रपट केला आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी ह्यांच्या प्रणब माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स ह्या लक्षणीय चरित्रातून ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या विलक्षणय आयुष्याची झलक बघायला मिळते. ह्या सत्रात शर्मिष्ठा त्यांच्या कामाला वाहून घेतलेल्या व अत्यंत धार्मिक बाबांबद्दल बोलणार आहे. जेवताना एखाद्या अड्ड्यावर सांगाव्या तशा हकिकती सांगणाऱ्या आणि आपले विचार कधीच मुलीवर न लादणाऱ्या वडिलांच्या आठवणी त्या सांगणार आहेत.
सर्वांचे मने जिंकणारे आणि प्रत्येक नवीन काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जादू करणारे गुलझार साहेब सातत्याने जुन्या आठवणी कडव्यांमध्ये विणत आहेत. पुरस्कारप्राप्त अनुवादक आणि लेखक रक्षंदा जलील ह्यांचे बाल ओ-पार हे गुलझार साहेबांच्या समग्र काव्याचा अनुवाद आहे. सहा खंडांतील कवितांचा हा अनुवाद आहे. हे दोघे मिळून आपल्याला ह्या अप्रतिम कलाकृतीचा परिचय करून देणार आहेत. इतिहास, मानवी अनुभव व काव्यात्मक अभिव्यक्ती ह्यांचे दर्शन घडवणार आहेत.
ह्या महोत्सवात फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानींच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची निर्मिती शिवणकामाच्या इतिहासातून वाट काढणारी आहे. जागतिकीकरण आणि वसाहतवादाचा पोशाखावर होणारा प्रभाव ते विस्मृतीत गेलेल्या तंत्रांचे पुनरुज्जीवन हे सर्व काही त्यांच्या कामात दिसून येते. शोध पत्रकार अलिया अलाना ह्यांच्या सोबत त्यांनी लिहिलेल्या जर्नी टू इंडिया मॉडर्न ह्या पुस्तकातून त्यांनी आपल्या कौशल्यांसाठी निवडलेले मार्ग आणि आजच्या जगात स्वत:च्या लग्झरी डिझाइन स्टुडिओचे महत्त्व हे सर्व काही उलगडले जाते. टीव्ही सूत्रसंचालक व फॅशन कन्सल्टण्ट अंबिका आनंद ह्यांच्याशी होणाऱ्या संवादाद्वारे ताहिलियानी जगभरातील फॅशनच्या शोधातून मिळालेल्या माहितीबाबत, वेळ व स्थळाच्या सीमा ओलांडून काही सांगण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत आणि आपल्या डिझाइन्सच्या माध्यमातून उभ्या केलेल्या प्रश्नांबाबत, सांगणार आहेत.
महोत्सवामध्ये आध्यात्मिक इतिहासांवरही चर्चा होणार आहे. हिमालयाच्या पवित्र भूप्रदेशांमध्ये आध्यात्मिक व गूढ शोधांची कालातीत परंपरा आहे. प्रबुद्ध गुरूंचे अस्तित्व धार्मिक व आध्यात्मिक समुदायांमध्ये कायमस्वरूपी जिवंत कसे राहिले? प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक अँड्र्यू क्विंटमन ह्यांनी तिबेटी धर्मगुरू आणि आध्यात्मिक कवी मिलारेपा ह्यांच्याबद्दल विस्तृत लिहिले आहे. अभिनेते व लेखक केली दोरजी हे बुद्ध धर्म आचरणात आणत आहेत. द हिडन रेनबो हे त्यांचे पुस्तक म्हणजे वाचकांना, आतील शांतता व स्वीकृतीच्या शोधात, बौद्ध प्रतिकांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आहे. हे दोघे मिळून मिलारेपांच्या आयुष्यातील साहित्यिक प्रतिनिधित्वावर चर्चा करणार आहेत आणि ह्या आयुष्यांच्या कथा अक्षरांच्या पलीकडे नेऊन कलात्मक, रुढी व जिवंत आयामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी विचारात घेण्याजोगे अनेक मार्ग ह्यांचा उहापोह करणार आहेत. ह्या सत्रात मिस्टिक्स अॅड स्केप्टिक्स: इन सर्च ऑफ हिमालयन मास्टर्स ह्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे.
अभिजाततेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सांस्कृतिक समालोचक मेरी बेअर्ड ह्यांनी ट्वेल्व्ह सीझर्स: इमेजेस ऑफ पॉवर फ्रॉम द एन्शंट वर्ल्ड टू द मॉडर्न ह्या नवीन पुस्तकातून, रोमन कलेने दोन सहस्रकांहून अधिक काळ पाश्चिमात्य जगताच्या सत्तेच्या समजुतीला कसा आकार दिला, ह्याचा शोध घेतला आहे. प्राचीन साम्राज्यवादी प्रतिमा आणि आधुनिक दृश्य कल्पना ह्यांचे परीक्षण करत, बेअर्ड आपल्याला रोमन सम्राटांच्या, विशेषत: ‘ट्वेल्व्ह सीझर्सच्या’ प्रतिमांमधून घेऊन जातात. ह्यात निर्दयी ज्युलीयस सीझरपासून फुलपाखरांचा छळ करणाऱ्या डोमिशिअनपर्यंत अनेक प्रतिमा आहेत. त्यांचे आधुनिक काळाच्या संदर्भातील महत्त्व पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. इतिहासकार, लेखक आणि पॉडकास्टर टॉम हॉलंड ह्यांच्यासोबत त्या बदलत्या ओळखी, ओळखीचा हेतूत: केलेला विपर्यास आणि अधिकारांचे अनेकदा केले जाणारे अनिश्चित स्वरूपाचे प्रतिनिधित्व ह्या मुद्दयांवर बोलणार आहेत.
यंदाही महोत्सवाच्या आयोजकांनी एक्सक्लुजिव फ्रेण्ड ऑफ द फेस्टिवल (एफओएफ) पॅकेज दिले आहे. त्यामध्ये एका अद्वितीय अनुभवाची ग्वाही देण्यात आली आहे. एफओएफ्सना खासगी फेस्टिवल लाउंजमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यातून त्यांना संवाद साधता येईल, नेटवर्किंग करता येईल, कधी महोत्सवातील वक्त्यांशीही बोलता येईल. ह्या पॅकेजमध्ये महोत्सवाच्या दिवसांमधील भोजनाचा समावेश आहे. निवडक सत्रांना प्राधान्याने प्रवेशाची सुविधा आहे. तसेच जयपूर म्युझिक स्टेजवरील प्रत्यक्ष सांगीतिक सादरीकरणांना उपस्थित राहण्याची मुभा आहे. शिवाय, एफओएफ्सना जादूई अमेर किल्ल्यावरील सांस्कृतिक संध्या कार्यक्रमांनाही निमंत्रित केले जाईल. त्याचप्रमाणे फेस्टिवल लाउंजमधील कॉकटेल्सचाही आस्वाद घेता येईल. ह्या नेत्रदीपक सोहळ्याच्या सांगतेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या रायटर्स बॉललाही त्यांना प्रवेश मिळेल.
‘फ्रेण्ड ऑफ द फेस्टिवल’ पॅकेज खालील लिंकवर जाऊन बूक करता येईल: https://jaipurliteraturefestival.org/friendsofthefestival-registration.
महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या
A


