ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची स्वतंत्र नवीकरणीय ऊर्जा उत्पादक (Independent Power Producer – IPP) कंपनी आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या एकूण क्षमतेच्या आधारे, ही कंपनी देशातील टॉप 10 IPP कंपन्यांमध्ये मोडते. (स्रोत: CRISIL रिपोर्ट). एकूण क्षमता यामध्ये कार्यरत, बांधकामाधीन, करारबद्ध व मिळालेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनी आपले युटिलिटी स्केल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प स्वतःच्या EPC (Engineering, Procurement & Construction) आणि O&M (Operations & Maintenance) टीमच्या साहाय्याने विकसित, उभारते, चालविते आणि देखभाल करते. कंपनीचा महसूल विविध वीज खरेदीदारांना — ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या पाठबळाची संस्थाही असतात — वीज विकून मिळतो.
ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड (SEBI)कडे दाखल केला आहे. कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) द्वारे ₹3,000 कोटी (₹30,000 दशलक्ष) उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामध्ये प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत.
या ऑफरमध्ये ₹3,000 कोटी (₹30,000 दशलक्ष)पर्यंतच्या नवीन इक्विटी शेअर्सच्या इश्यूचा (Fresh Issue) समावेश आहे.
कंपनी निव्वळ उत्पन्नाचा (Net Proceeds) उपयोग खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते – (i) कंपनीने घेतलेल्या काही कर्जाचे संपूर्ण किंवा अंशतः पुनर्भरण / पूर्वनिर्धारित फेड, यासाठी अंदाजे ₹1092.27 कोटी (₹10,922.71 दशलक्ष) खर्च होईल. (ii) कंपनीच्या महत्त्वाच्या उपकंपन्यांमध्ये (Material Subsidiaries) — Juniper Green Gamma One Private Limited, Juniper Green Three Private Limited, Juniper Green Field Private Limited, Juniper Green Beam Private Limited, तसेच उपकंपन्या Juniper Green Kite Private Limited आणि Juniper Green Ray Two Private Limited — यांना त्यांच्या काही प्रलंबित कर्जाच्या संपूर्ण किंवा अंशतः पुनर्भरणासाठी भांडवल गुंतविणे, यासाठी अंदाजे ₹1157.72 कोटी (₹11,577.29 दशलक्ष) खर्च अपेक्षित आहे. (iii) उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येईल. (“Object of Issue”)
ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेडने मार्च 2020 मध्ये 100 मेगावॅट (144.97 मेगावॅट पीक) क्षमतेचा आपला पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर, कंपनीने आपल्या प्रकल्पांचा पोर्टफोलिओ वाढवून 31 मे 2025 पर्यंत एकूण 7,898.45 मेगावॅट (10,069.58 मेगावॅट पीक) क्षमतेपर्यंत विस्तार केला आहे. सौरऊर्जा प्रकल्पांव्यतिरिक्त, ज्युनिपर ग्रीनच्या पोर्टफोलिओमध्ये वाऱ्याच्या ऊर्जा प्रकल्पांसोबतच WSH आणि FDRE अशा गुंतागुंतीच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा व BESS यांसारख्या बॅटरी ऊर्जा संचयन प्रणालींचा समावेश आहे. CRISIL रिपोर्टनुसार, 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या WSH आणि FDRE टेंडर्समध्ये ज्युनिपर ग्रीन ही एकूण क्षमतेच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वात मोठी बोलीदार कंपनी आहे आणि या टेंडर्समध्ये 100% प्रकल्प रूपांतरित करण्यात (conversion rate) यश मिळविले आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात येणाऱ्या इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) या प्रमुख स्टॉक एक्स्चेंजवर होण्याचा प्रस्ताव आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, JM फायनान्शियल लिमिटेड व कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड काम करत आहेत.


