Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी एम३६ ५जी लाँच, मिड-सेगमेंट स्‍मार्टफोन्‍समध्‍ये प्रगत एआय इनोव्‍हेशन्‍स सादर...

सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी एम३६ ५जी लाँच, मिड-सेगमेंट स्‍मार्टफोन्‍समध्‍ये प्रगत एआय इनोव्‍हेशन्‍स सादर गॅलॅक्सी एम३६ ५जी सर्कल टू सर्च विथ गुगल वैशिष्‍ट्यासह येतो, ज्‍यामुळे मोबाइल एआय अधिकाधिक व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचेल

पुणे, भारत – जुलै ३, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज अत्‍यंत लोकप्रिय गॅलॅक्‍सी एम सिरीजमधील नवीन स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्सी एम३६ ५जी’च्‍या लाँचची घोषणा केली. भारतातील तरूण ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्सी एम३६ ५जी मध्‍ये एआय इनोव्‍हेशन्‍सच्‍या श्रेणीसह विविध सेगमेंट-लीडिंग वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ५० मेगापिक्सल ओआयएस ट्रिपल कॅमेरा, कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस®+ संरक्षण आणि अँड्रॉईड अपग्रेडच्‍या ६ जनरेशन्‍स.

 

“ग्राहकांचे जीवन सक्षम करणारे अर्थपूर्ण इनोव्‍हेशन्‍स सादर करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचा भाग म्‍हणून आम्‍ही सेगमेंट-लीडिंग वैशिष्‍ट्ये आणि एआय इनोव्‍हेशन्‍स असलेला गॅलॅक्‍सी एम३६ ५जी लाँच करत आहोत, जो किफायतशीर दरामध्‍ये येतो. स्‍टायलिश व टिकाऊ गॅलॅक्‍सी एम३६ ५जी ग्राहकांच्‍या जीवनशैलीला पूरक आहे. सर्कल टू सर्च विथ गुगल आणि जेमिनी लाइव्‍ह सादर करत आम्‍ही गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये मोबाइल एआयचे अधिक लोकशाहीकरण करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे संचालक रिषी कुलश्रेथा म्‍हणाले.

 

एआयचे लोकशाहीकरण

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी सर्कल टू सर्च विथ गुगलसह येईल, ज्‍यामुळे गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टमधील अधिकाधिक डिवाईसेसमध्‍ये मोबाइल एआयचे लोकशाहीकरण होईल. सॅमसंग-गुगल यांच्‍यामधील सहयोगावर आधारित डिझाइन करण्‍यात आलेले सर्कल टू सर्च गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना फोटो, टेक्‍स्‍ट्स व संगीतसंदर्भात विनासायास सर्च अनुभव देते. तसेच, हा स्‍मार्टफोन जेमिनी लाइव्‍हसह नवीन एआय अनुभव देखील देईल, ज्‍यामुळे गॅलॅक्‍सी वापरकर्त्यांना एआयसोबत रिअल-टाइम व्हिज्‍युअल संवाद करता येतील. एआय-पॉवर्ड सहाय्यतेच्‍या माध्‍यमातून गॅलॅक्‍सी वापरकर्ते अधिक सहजतेने परस्‍परसंवाद करू शकतात, ज्‍यामुळे दैनंदिन टास्‍क्‍स अधिक सोपे होतील.

 

नवीन डिझाइन आणि मॉन्‍स्‍टर टिकाऊपणा

 

डिझाइनला प्राधान्‍य देत गॅलॅक्‍सी एम३६ ५जी फक्‍त ७.७ मिमी स्लिम आहे, तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रीमियम कॅमेरा डेको आणि सेगमेंट-लीडिंग कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस®+ संरक्षण आहे, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन शक्तिशाली व एर्गोनॉमिक आहे. सेगमेंट लीडिंग संरक्षणामुळे नकळतपणे खाली पडल्‍यामुळे स्‍मार्टफोनचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते, तसेच वापरकर्त्‍यांना ओरखड्यांबाबत कोणतीही चिंता करण्‍याची गरज नाही. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्‍टर तंत्रज्ञान आहे, ज्‍यामुळे हा डिवाईस प्रखर सूर्यप्रकाशात देखील अद्वितीय व्‍युइंग आणि सुलभ स्‍क्रॉलिंग अनुभव देतो. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी व्‍हेल्‍व्‍हेट ब्‍लॅक, सेरेन ग्रीन आणि ऑरेंज हेझ या तीन उत्‍साही व आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

प्रगत कॅमेरा

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍यासाठी प्रगत ५० मेगापिक्‍सल ओआयएस ट्रिपल कॅमेरा आहे. ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन) खात्री देते की व्हिडिओज शेक-फ्री कॅप्‍चर करता येतात आणि फोटो ब्‍लर येत नाहीत, ज्‍यामुळे वापरकर्ते चालता-फिरता त्‍यांचे आवडते क्षण कॅप्‍चर करू शकतात. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मधील कॅमेरे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट फोटोज कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या स्‍मार्टफोनमधील ऑटो नाइट मोड नाइटोग्राफीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. वापरकर्ते फ्रण्‍ट व रिअर कॅमेऱ्यांवर ४के व्हिडिओज रेकॉर्ड करू शकतात, तसेच वास्‍तविक रंगसंगतीमध्‍ये फोटो कॅप्‍चर करू शकतात. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी फोटो रिमास्‍टर आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजर यांसारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेला परिपूर्ण पॅकेज म्‍हणून काम करेल, जो वापरकर्त्‍यांचा अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये आकर्षक, सुस्‍पष्‍ट सेल्‍फीजसाठी १३ मेगापिक्‍सल हाय-रिझॉल्‍यूशन फ्रण्‍ट कॅमेरा देखील आहे.

 

मॉन्‍स्‍टर कार्यक्षमता

 

५एनएम-आधारित एक्झिनॉस १३८० प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलॅक्‍सी एम३६ ५जी गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम आहे. मोठे वेपर कूलिंग चेम्‍बर असलेला हा डिवाईस कार्यक्षमपणे उष्‍णता प्रसरणाची खात्री देईल, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना विनासायास गेमिंग अनुभव आणि अत्‍यंत सुलभ प्रोसेसिंग मिळेल. ५जी चे अल्टिमेट स्‍पीड व कनेक्‍टीव्‍हीटीसह वापरकर्ते सर्वत्र पूर्णत: कनेक्टेड राहू शकतात, जेथे त्‍यांना गतीशील डाऊनलोड्स, सुलभ स्‍ट्रीमिंग आणि विनासायास ब्राऊजिंगचा अनुभव मिळेल.

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळपर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनसोक्‍त मनोरंजनाची खात्री देते. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी वापरकर्त्‍यांना कनेक्‍टेड राहण्‍यास, विनाव्‍यत्‍यय मनोरंजनाचा आनंद घेण्‍यास आणि उत्‍पादनक्षम राहण्‍यास मदत करतो. या डिवाईसमध्‍ये २५ वॅट फास्‍ट चार्जिंग आहे, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन कमी वेळेत लवकर चार्ज होतो.

 

गॅलॅक्‍सी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस

 

नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करत गॅलॅक्‍सी एम३६ ५जी सेगमेंटमधील अँड्रॉइड अपग्रेड्सच्‍या सर्वोत्तम ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स देईल, ज्‍यामुळे फ्यूचर-रेडी अनुभवाची खात्री मिळेल. गॅलॅक्‍सी एम३६ ५जी वन यूआय ७ आऊट ऑफ द बॉक्‍ससह येईल.

 

वन यूआय ७ साध्‍या, प्रभावी व इमोटिव्‍ह डिझाइनसह येते, ज्‍यामधून गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना सुव्‍यवस्थित व कोहेसिव्‍ह अनुभव मिळेल. सुलभ होम स्क्रिन, रिडिझाइन केलेले वन यूआय विजेट्स आणि लॉक स्क्रिन वापरकर्त्‍यांना त्‍यांचे डिवाईसेस विनासायासपणे कस्‍टमाइज करण्‍याची सुविधा देतात. अधिक सोयीसुविधेसाठी नाऊ बार लॉक स्क्रिनवर सर्वात महत्त्वाचे असलेले रिअल-टाइम अपडेट्स देते.

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य ‘सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट’ देखील असेल. ही हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते. तसेच यामध्‍ये सॅमसंगचे नाविन्‍यपूर्ण टॅप अँड पे वैशिष्‍ट्यासह सॅमसंग वॉलेट देखील असेल, ज्‍यामुळे ग्राहकांना सुरक्षितपणे व प्रभावीपणे पेमेंट करता येईल.

 

उत्‍पादन

 

व्‍हेरिएण्‍ट

 

सुरूवातीची किंमत

 

ऑफर्स

 

 

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी

 

६ जीबी + १२८ जीबी

 

१६४९९ रूपये

 

 

 

१००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटसह

 

८ जीबी + १२८ जीबी

 

१७९९९ रूपये

 

८ जीबी + २५६ जीबी

 

२०९९९ रूपये

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गॅलॅक्‍सी एम३६ ५जी १२ जुलै २०२५ पासून S

amsung.com, अॅमेझॉनवर आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments