नवी दिल्लीमधील मॅक्स हेल्थकेअर येथील डायटेटिक्सच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार यांचा लेख
हृदयरोग आणि उच्च रक्तदाब अशा जीवनशैली आजारांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. बदाम, ओट्स, संपूर्ण धान्य, फळे व भाज्या अशा पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पातळ्यांचे नियमन करण्यास मदत होऊ शकते. पौष्टिक आहारासह नियमितपणे व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. या लेखामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांबाबत माहिती जाणून घेऊया, जे दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केल्यास आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल पातळ्या राखण्यास मदत करू शकतात.
बदाम: बदाम पौष्टिक पॉवरहाऊस आहेत. बदामांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम व झिंक असे १५ आवश्यक पौष्टिक घटक असतात. दैनंदिन आहारामध्ये बदामांचा समावेश केल्याने एकूण व एलडीएल कोलेस्ट्रॉल पातळ्या कमी होण्यास मदत होऊ शकते, तसेच हृदयासाठी हानीकारक असलेली जळजळ देखील कमी होऊ शकते. मूठभर बदामांचे सेवन केल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये देखील सुधारणा होऊ शकते, पोटावर येणारी चरबी कमी होऊ शकते आणि कमरेचा घेर कमी होऊ शकतो. हे सर्व हृदयरोगासाठी धोकादायक घटक आहेत. आहारामध्ये सहजपणे बदामांचा समावेश करता येतो, जसे सलाड्स, डेझर्ट्स किंवा स्मूदीजमध्ये बदाम टाकत ते पौष्टिक करता येतात. बदाम अत्यंत पौष्टिक आहेत.
संपूर्ण धान्य आणि ओट्स: आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट केल्याने अनेक आरोग्यसंबंधित फायदे मिळतात, जसे रक्तदाब सुधारतो, हृदयसंबंधित आजारांचा धोका कमी होतो, वजनावर नियंत्रण राहते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. विशेषतः ओट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयसंबंधित आजारांचा धोका कमी करण्यास गुणकारी आहे. आहारामध्ये संपूर्ण धान्य आणि ओट्स समाविष्ट करण्यासाठी ब्रेकफास्टकरिता ओटमील किंवा संपूर्ण धान्य निवडा, बेकिंगमध्ये संपूर्ण धान्याचे पीठ वापरा, सलाड किंवा सूपमध्ये शिजवलेले संपूर्ण धान्य वापरा, स्मूदीमध्ये ओट्स मिसळा आणि सँडविचसाठी संपूर्ण धान्याचे ब्रेड निवडा.
फळे: फळांनी समृद्ध आहार लिपिड आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते, कारण अशा आहारामध्ये फायबर कन्टेन्ट, उच्च पाण्याची पातळी आणि कमी संतृप्त फॅट असते. हे घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, तसेच भूकेवर नियंत्रण देखील ठेवतात, भूकेचे शमन करतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आहारामध्ये फळांचा प्रभावीपणे समावेश करण्यासाठी फळांना स्मूदीमध्ये मिसळा, सेरेल, दही किंवा सलाडमध्ये मिक्स करा, पौष्टिक स्नॅक म्हणून सेवन करा, फळांचा रस किंवा फ्रोजन ट्रीट्स तयार करा आणि अधिक पौष्टिकतेसाठी बेकिंग व चवदार पदार्थांमध्ये फळांचा वापर करा.
लसूण: आहारामध्ये नियमितपणे लसूण समाविष्ट केल्याने एकूण आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. स्वयंपाक करताना लसूण भाजून भाज्यांमध्ये परतून घ्या किंवा सॅलड, डिप्स आणि करीमध्ये समाविष्ट करत जेवण तयार करा. अतिरिक्त चवीसाठी लसूण पावडर घाला किंवा डाळीसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मिक्स करा.
आरोग्यदायी आहाराचे सेवन करण्यासोबत हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. या आहारसंबंधित आरोग्यदायी सवयी अंगिकारा आणि नियमितपणे व्यायाम करा, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळ्यांवर नियंत्रण राहिल आणि आरोग्य उत्तम रा
हिल.


