Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी* *एकल मातांना मदतीचा प्रस्ताव...

दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी* *एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन* 

 

 

*पुनर्निमाण सोशल फाऊंडेशनच्या वतीने १७०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान*

 

आपल्या संस्कृतीत देणाऱ्या ने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एके दिवशी देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे सांगितले जाते. याचा अर्थ समाजातील प्रत्येकामध्ये दातृत्वाची भावना रुजली पाहिजे. याच भावनेतून कोथरुड मध्ये विविध प्रकारची सेवा कार्ये अव्याहत सुरु आहेत, अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच, एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

 

पुनर्निमाण सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कोथरुड मधील आर्थिक दुर्बल कुटुंबातील १७०० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मनिषा बुटाला, ज्योत्स्ना कुलकर्णी, रेश्मा बराटे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, भाजप पुणे शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते गिरीश भेलके, विशाल रामदासी, रणजीत हरपुडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ना. पाटील म्हणाले की, आपल्या समाजात दातृत्वाला अनन्यासाधारण महत्व आहे. सामाजिक काम हे गरजेवर आधारित आणि निर्पेक्ष भावनेने केले पाहिजे, जेणेकरून त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो.

 

ते पुढे म्हणाले की, विंदा करंदीकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे,’ याचा अर्थ समाजातील दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या क्षमतेनुसार चारजणांना शक्य ती मदत केली पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

एकल माता कुटुंबाला मदतीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगताना ते म्हणाले की, समाजात एकल माता असलेली असंख्य कुटुंब आहेत. जिथे एक महिला कुटुंबाचा आधार असते. एका सर्वेमध्ये कोथरुड मध्ये ९५० माता असल्याचे निदर्शनास आले. त्यांना समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले.

 

समाजातील अशा कुटुंबाचा शोध घेऊन, त्यांना मदत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असून, त्यासाठी उच्च शिक्षण विभागाअंतर्गत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्यातील एकल मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments