Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री लकडीपूल विठ्ठल मंदिरातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

पुणे : श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने मुळशी तालुक्यातील वाळेन गावातील आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. संस्थेचे आश्रम मुळशी तालुक्यात असून, तेथील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना सातत्याने शैक्षणिक मदत ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते.

 

टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते आणि पुणे होर्डिंग्ज असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे, ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, स्वप्निल काळभोर, विनोद मणियार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप थोरात, राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे उपस्थित होते. श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष दीपक थोरात यांचे विशेष सहकार्य उपक्रमाला मिळाले.

 

यावेळी वेगवेगळ्या वयोगटातील एकूण २२ विद्यार्थ्यांना पेन, कंपास, सॅक, छत्र्या यांसह आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

 

तसेच, पुणे येथील जनता वसाहतीत समाज कल्याण अभ्यासिका उपक्रमाअंतर्गत १ ली ते ४ थीच्या २० आणि ५ वी ते १० वीच्या २२ विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वह्यांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे पालक मजुरीवर उदरनिर्वाह करतात, त्यामुळे त्यांना शालेय साहित्य मिळणे कठीण असते. ही गरज लक्षात घेऊन समाजकल्याण अभ्यासिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

 

दीपक थोरात म्हणाले, समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करणे हीच खरी सेवा आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अशा उपक्रमांना पुढेही मदत कर

धोत राहू.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments