Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. 8: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि हरीभाई व्ही देसाई वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार मंगळवार, 15 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता हरीभाई व्ही देसाई वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालय, 596, भाऊ रंगारी रोड, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, बुधवार पेठ, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 481, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे 411011 येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments