पुणे, दि. ९ : ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ च्या व्हिजन डॉक्यूमेंट तयार करण्याकरिता महसूल विभागाच्या विभागस्तरीय सर्वेक्षणाअंतर्गत क्षेत्रीय गटाच्या अनुषंगाने ‘जमीन’ विषयावर नागरिकांनी आपले अभिप्राय १७ जुलै २०२५ पर्यंत https://forms.gle/WDcqhvFzsnJCcX3n8 या गुगलशीटमध्ये भरुन पाठवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
या सर्वेक्षणात ‘जमीन’ विषयाच्या अनुषंगाने एकूण ८ प्रश्न नमूद असून इंग्रजी व मराठी भाषेमध्ये असलेले सर्वेक्षण प्रारुप गुगलशीट तयार करण्यात आले आहेत. गुगल शीटच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये त्यांचे अभिप्राय नोंदवावे, ही लिंक आपल्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवून त्यांनाही सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


