Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिमुकल्यांनी मातृपूजनाने साजरी केली गुरुपौर्णिमा* शि.प्र. मंडळी च्या अप्पा बळवंत चौकातील...

चिमुकल्यांनी मातृपूजनाने साजरी केली गुरुपौर्णिमा* शि.प्र. मंडळी च्या अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि.शिशु शाळेतर्फे आयोजन

 

 

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरूंना परमेश्वराचे स्थान दिले आहे. आई-वडील हे प्रत्येकाचे पहिले गुरु. त्यामुळे बालवाडीतील चिमुकल्यांनी मातृपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. आजच्या बदलत्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीत आईचे महत्व चिमुकल्यांना समजावे, याकरिता या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शि.प्र. मंडळी च्या अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि.शिशु शाळेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर, चैत्राली वाघ, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा, शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

मीना कुर्लेकर म्हणाल्या, मुलांना व्यायाम करायला शिकवणे, ही आजची गरज आहे. शरीरसंपदा ही खरी संपत्ती आहे. आपण कसे वागतो, त्याप्रमाणे मुले अनुकरण करतात. त्यामुळे प्रत्येक पालकाची वागणूक चांगली असायला हवी. मुलांना स्वतःचा विचार स्वतः करायला शिकवायला हवे.

 

पराग ठाकूर म्हणाले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही आपली संस्कृती आहे. लहानपणापासून सर्व काही करणारी ही प्रत्येकाची आई असते. ती जाणीव मुलांना करून देणारा हा काळ आहे. आपल्या मुलांनी उत्तम नागरिक व्हावे, असे वाटत असेल तर प्रत्येक पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. भारताचा सुजाण नागरिक घडविण्यास कटिबद्ध होण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना त्यापासून लांब ठेवणे आवश्यक आहे. पालकांचे अनुकरण विद्यार्थी करतात हे लक्षात ठेवून, आपण वागले पाहिजे असे पियुष शहा यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments