Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedडब्ल्यूआयएएने रचला विक्रम- प्रादेशिक परिवहन विभागाच्या देखरेखीखाली चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन

डब्ल्यूआयएएने रचला विक्रम- प्रादेशिक परिवहन विभागाच्या देखरेखीखाली चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन

मुंबई, १० जुलै २०२५ – यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला द वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनने (डब्ल्यूआयएए) आयोजित केलेल्या चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेने नवा विक्रम रचला आहे. डब्ल्यूआयएएचे श्री.नितीन दोसा यांच्या नेतृत्वाखाली रस्ते सुरक्षा अभियानासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. ३६व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना २०२५ या काळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्पर्धेची नोंद होणे हे रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी आयोजित उपक्रमाचे महत्त्वाचे यश मानले जात आहे.

 

 

 

डब्ल्यूआयएएने २१ जानेवारी, २०२५ रोजी चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा प्रादेशिक परिवहन विभागाच्या देखरेखीखाली पार पडली. ही स्पर्धा अतिरिक्त परिवहन आयुक्त श्री.भरत कळसकर आणि ठाणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या उत्कृष्ट समन्वयातून पार पडली. या दोघांच्या मार्गदर्शनामुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करता आली. हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबविता आला, या शब्दांत डब्ल्यूआयएएने संबंधितांना धन्यवाद दिले.

 

 

 

तब्बल ११ हजार ८२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. चित्रकला आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून रस्त्यांवरून चालताना, प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, वाहन चालविताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यावात, वाहतूककोंडी आदींबाबत शालेय विद्यार्थ्यांनी चित्र काढले व विविध घोषणाबाजीची फलके तयार केली गेली.

 

 

 

या विक्रमी नोंदीनंतर नुकतेच पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जुलै २०२५ रोजी ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत एक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार समारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेवती श्रीनिवासन आणि इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या पुरस्कार समारंभात खालील शाळांमधील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.:

 

● श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे

 

● श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया स्कूल, ठाणे

 

● गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल, ठाणे

 

● सिंघानिया स्कूल, वापी

 

 

 

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी, शिक्षणतज्ज्ञांनी, तसेच रस्ते सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते तब्बल शंभर विजेत्यांचा त्यांच्या भरीव योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. हे अभियान डब्ल्यूआयएएच्या राष्ट्रीय सुरक्षा महिन्यातील योगदानाचे खास वैशिष्ट्य ठरले. यातून युवक सहभाग, सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयी आणि शाश्वत वाहतूक शिक्षणाप्रती डब्ल्यूआयएएची बांधिलकी अधिक दृढ झाली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments