Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorized*लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२८ वा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा*

*लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२८ वा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा*

 

 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी घेतले दर्शन. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उद्योजक राजकुमार अग्रवाल, यांच्या हस्ते झाली आरती

 

पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… गुरुदेव दत्त… च्या नामघोषात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात भाविकांनी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मोठया संख्येने गर्दी केली. ट्रस्टच्या १२८ व्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिराला सुभाष सरपाले यांनी आकर्षक पुष्पसजावट व गणेश वाईकर यांनी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.

 

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजता मंगलवाद्याने उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर हलवाई परिवाराच्या वतीने लघुरुद्र करण्यात आला. प्रात: आरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी दोन दत्तयाग देखील करण्यात आले.

 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांनी मंदिरात येवून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. मंदिराचा इतिहास, गुरुपौर्णिमेचे महात्म्य व पुणे शहराच्या आध्यात्मिक क्षेत्रात असलेले या मंदिराचे असलेले अग्रेसर स्थान या बाबत ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी त्यांना माहिती दिली.

 

दुपारी १२:३० वाजता अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योजक अमिता व राजकुमार अग्रवाल तसेच श्री बालाजी सोसायटीचे बी.परनधामन व चेंदुरवर्धिनी यांच्या हस्ते असंख्य भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वाची माध्यान्ह आरती झाली. त्याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी उपस्थित होते.

 

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे व विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांनी प्रसादाचे नियोजन केले. सायं आरती पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश महेंद्र महाजन व सुलभा महाजन या उभयतांच्या हस्ते संपन्न झाली.

 

सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत मंदिरासमोरील उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेक केले. सायंकाळी अमोल पटवर्धन व सहकाऱ्यांनी गुरुनामाची ओढ हा सुरेल भक्तिसंगीतचा कार्यक्रम सादर केला. निशा आरती मृणालिनी हेमंत रासने यांच्या हस्ते झाली. रात्री मंदिरात गुरुवारनिमित्त साप्ताहिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments