Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआयच्या माध्यमातून सेल्सफोर्स गोदरेज कॅपिटलच्या कर्ज व्यवसायाची प्रक्रिया अद्ययावत करणार

एआयच्या माध्यमातून सेल्सफोर्स गोदरेज कॅपिटलच्या कर्ज व्यवसायाची प्रक्रिया अद्ययावत करणार

गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांच्या डिजिटल कर्ज प्रक्रियेला गती देण्यासाठी सेल्सफोर्सच्या एआय-नेतृत्वाखालील प्लॅटफॉर्म आणि डेलॉइटच्या अंमलबजावणी कौशल्याचे एकत्रीकरण.

 

 

● गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांच्या सध्याच्या एआय-नेतृत्वाखालील पायाभूत सुविधांना पूरक ठरेल आणि या प्लॅटफॉर्मला मजबूत करण्यासाठी ही भागीदारी सेल्सफोर्सच्या एआय-नेतृत्वाखालील मूळ कर्ज प्रणालीला (LOS) एकत्र करते, ज्यामुळे डिजिटल ऑनबोर्डिंग, जोखमीची योग्य माहिती आणि ऑपरेशनल चपळतेला गती मिळते.

 

 

 

मुंबई, 11 जुलै, 2025: गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांच्या डिजिटल कर्ज देणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि भारतातील त्यांच्या ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा गोदरेज कॅपिटल आणि #1 एआय सीआरएम* सेल्सफोर्स यांनी आज धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली. या उपक्रमासाठी डेलॉइट इंडिया अंमलबजावणी भागीदार म्हणून सहभागी करण्यात आले आहे. ज्यामुळे गोदरेज कॅपिटलच्या कर्ज देण्याच्या यंत्रणेत सेल्सफोर्सच्या प्रगत प्लॅटफॉर्मचे अखंड एकत्रीकरण सुलभ होते.

 

 

 

नावीन्यपूर्ण गोष्टींवर सातत्यपूर्ण ध्यास आणि GenAI-चलित उपाय लवकरात लवकर अमलात आणणे हीच ओळख असलेल्या सेल्सफोर्ससोबतचे हे सहकार्य भविष्याच्या दृष्टीने डिजिटल यंत्रणा तात्काळ स्वीकारणारी इकोसिस्टीम तयार करण्यासाठी एक सामायिक दृष्टिकोन दाखवते. मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान परिवर्तने प्रदान करण्यातील डेलॉइटच्या सिद्ध कौशल्यासह कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ही भागीदारी ऑपरेशनल यंत्रणेला बढावा देण्यासोबतच, उत्तम ग्राहक अनुभव देण्यासोबतच जोखीम ओळखण्याचे कौशल्य लक्षणीयरीत्या वाढवेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

या सहकार्याचा एक भाग म्हणून, कंपनी कर्जाच्या मूळ प्रणालीला (LOS) सर्वोत्तम-इन-क्लास एआय-चलित प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करून तिच्या कर्ज प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करते आहे. तसेच विद्यमान मुख्य ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM) प्लॅटफॉर्मसह कंपनीच्या सर्व उत्पादनांसाठी सेल्सफोर्सद्वारे समर्थित एआय-चलित प्लॅटफॉर्मची मदत घेतली जात आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे कर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी होते – अर्ज भरण्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत. या सुधारणांचे उद्दिष्ट व्यक्ती तसेच उद्योगांना जलद सेवा देणे, प्रक्रियेतील अचूकता वाढवणे आणि क्रेडिट डिलिव्हरी मजबूत करणे हे आहे.

 

 

 

सेल्सफोर्सच्या एआय-चलित दृष्टिकोनाची मदत घेऊन, कंपनी कर्ज देण्याची डिजिटल प्रक्रिया अधिक अचूक करते आहे ज्यामुळे स्मार्ट क्रॉस-सेलिंग धोरणांना पाठबळ मिळेल, जोखीम व्यवस्थापन अधिक अचूक होईल आणि ग्राहकांना उत्तम अनुभव मिळतील. उत्पादने, चॅनेल आणि टचपॉइंट्सवर ग्राहकांना संपूर्ण सेवा उपलब्ध करत कंपनी उत्तम ग्राहक सेवा, जलद ऑपरेशनल यंत्रणा आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

 

 

 

या भागीदारीवरील प्रतिक्रिया:

 

गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, “आमचा तंत्रज्ञान-प्रथम दृष्टिकोन आणि GenAI मध्ये सुरू असलेली गुंतवणूक ही आम्ही ग्राहकांना आर्थिक उपाय कसे उपलब्ध करून देतो याचे निदर्शक आहे. एआय-चलित प्लॅटफॉर्ममध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या सेल्सफोर्ससोबतचे आमचे सातत्यपूर्ण सहकार्य या प्रयत्नांना पूरक असेच आहे. यामुळे आम्हाला अधिक स्मार्ट क्रेडिट अनुभव देणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे आणि वैयक्तिकरणासाठी नवीन संधी निर्माण करणे शक्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वित्तीय सेवांमधील आव्हाने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आणि अधिक सर्वसमावेशक, जलद कर्ज परिसंस्थेद्वारे भारताच्या व्यापक आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यावरील आमचे सामायिक लक्ष ही भागीदारी प्रतिबिंबित करते.”

 

 

 

सेल्सफोर्स – दक्षिण आशियाच्या अध्यक्षा आणि सीईओ अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “वित्तीय सेवा उद्योग एका निर्णायक टप्प्यावर आहे – जिथे तंत्रज्ञान केवळ आधुनिकतेसाठी नाही, तर ग्राहकांचा सहभाग वाढवणे, अचूक निर्णयासाठी मदत करणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणे या मूलभूत गोष्टींसाठी देखील उपयुक्त ठरते आहे. आजच्या डिजिटल जगात बुद्धिमत्ता, चपळता आणि विश्वासालाच सर्वाधिक प्राधान्य असेल. जलद निर्णय, ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास आणि मोठ्या प्रमाणात अधिक वैयक्तिकृत सहभागासह एआय या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. या क्षेत्रात गोदरेज कॅपिटल एक धाडसी नवोन्मेषक म्हणून उभे आहेत. त्यांच्या ग्राहक-प्रथम दृष्टिकोनाला ते डिजिटल-प्रथम या आजच्या गरजेसह एकत्र करते आहे. केवळ भारतातील एमएसएमईसाठीच नव्हे तर देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रत्येक कर्जदार, उद्योजक आणि कुटुंबासाठी क्रेडिट डिलिव्हरी पुनर्परिभाषित करत आहेत. या सर्वसमावेशक वाढीसाठी डेटा, बुद्धिमत्ता आणि गती एकत्र आणणाऱ्या एकात्मिक, एआय-संचलित प्लॅटफॉर्मसह त्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान आहे.”

 

 

 

डेलॉइट इंडियाचे पार्टनर अश्विन बल्लाळ म्हणाले, “या महत्त्वाकांक्षी परिवर्तनासाठी गोदरेज कॅपिटलसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होतो आहे. गोदरेज कॅपिटलच्या डिजिटल-फर्स्ट व्हिजनसह सेल्सफोर्सच्या एआय-नेतृत्वाखालील प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण भारतातील कर्ज देण्याचा अनुभव सुखद करण्यासाठी एक संधी देते आहे. आमचे सखोल ज्ञान, अंमलबजावणी क्षमता आणि जगातील सर्वोत्तम पद्धती गोदरेज कॅपिटलला फायदेशीरच ठरणार आहे. आणि जलद, स्केलेबल आणि भविष्यासाठी तयार डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्यास त्या मदत करतील.”

 

 

 

आपल्या विस्तारासह गोदरेज कॅपिटल उत्तम दर्जाचे आणि भविष्यासाठी तयार अशा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या इन-हाऊस टीम्स विविध कामांमध्ये GenAI च्या उपायांची मदत घेत आहेत. हे बळकट करण्यासोबतच कंपनीचे एंटरप्राइझ-ग्रेड GenAI आणि ML प्लॅटफॉर्म SAKSHAM देखील AI विकासाचे केंद्रीकरण करते. ज्यामुळे सुरक्षित LLM एकत्रीकरण सक्षम होते आणि विकसित होत असलेल्या BFSI लँडस्केपसाठी उत्तम, ग्राहक-केंद्रित उपाय सुचवते.

 

 

 

सध्या सुरू असलेल्या उत्पादन नवोपक्रमाचा एक भाग म्हणून, सेल्सफोर्स एजंटफोर्स सह एआय एंटरप्राइझच्या सीमा वाढवते आहे. यात सेल्सफोर्स प्लॅटफॉर्मचा समावेश असून तो कंपन्यांना व्यावसायिक कामात स्वतंत्रपणे कृती करण्यायोग्य सक्षम एआय एजंट तयार करण्यास आणि तैनात करण्यास मदत करतो. एजंटफोर्स हा सेल्सफोर्सची पुढील उत्क्रांती आहे. हे एक असे व्यासपीठ आहे जिथे एआय एजंट माणसांसोबत काम करून एक डिजिटल टीम तयार करतात जे मानवी क्षमता वाढवण्यासोबतच वेगाने आणि बुद्धिमान परिणाम देते.

 

 

 

* सेल्सफोर्स, #1सीआरएम, AI तंत्रज्ञान आणि क्षमतांनी समर्थित

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments