नवी दिल्ली| १४ जुलै २०२५: अविवा इंडिया या आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने आपली नवीन जीवन विमा ऑफर – अविवा भारत बाल विकास योजना, ही एक नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग प्लॅन्स आणण्याची घोषणा केली आहे. तिचा उद्देश ग्रामीण आणि निमशहरी भारतातील कुटुंबांना त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यास मदत करणे हा आहे. दरमहा फक्त १,००० रूपयांपासून सुरू होणाऱ्या प्रीमियमसह ही योजना हमी मॅच्युरिटी लाभ आणि जीवन कव्हर एकत्र आणते. त्यामुळे कुटुंबांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास किंवा अगदी लहान व्यवसाय सुरू करणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांसाठी आत्मविश्वासाने योजना आखण्यास मदत होते.
या योजनेत किमान वय ३ वर्षे आणि कमाल प्रवेश वय ५० वर्षे आहे. पॉलिसीची मुदत १२ ते ३० वर्षे आणि मॅच्युरिटी वय ८० वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे ती जीवनाच्या विविध टप्प्यांसाठी आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य बनते. त्याचे लवचिक प्रीमियम पेमेंट पर्याय – मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक – विविध घरगुती बजेटमध्ये बसणे सोपे करतात.
जीवन विमेदाराच्या पॉलिसी टर्ममधील मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत नामनिर्देशिताला खालीलपैकी एक सर्वाधिक मिळेल:
• डेथ सम इन्शुअर्ड किंवा
• मृत्यूच्या तारखेला सरेंडर व्हॅल्यू (गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू यापैकी जास्त असेल ते), किंवा
• एकूण प्रीमियम प्रदानाच्या X%** (किमान १०५%)
या अनावरणाबाबत बोलताना अविवा इंडियाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी विनित कपाही म्हणाले, “अविवा भारत बाल विकास योजना ही महानगरांच्या पलीकडे असलेल्या कुटुंबांच्या प्रत्यक्ष, दैनंदिन आकांक्षांवर आधारित आहे. ही योजना त्यांच्या मुलांच्या स्वप्नांचे संरक्षण आणि संगोपन करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी एक सोपी, ध्येय-केंद्रित योजना आहे. त्यात आर्थिक उत्पादनांशी संबंधित गुंतागुंती नाहीत.”
ही योजना पॉलिसी टर्मच्या शेवटी हमी दिलेल्या सम एश्युअर्डच्या स्वरूपात मॅच्युरिटी बेनिफिट्स देते. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळतो. प्रचलित कायद्यांनुसार कर लाभ देखील देते. त्यामुळे आर्थिक सुरक्षा आणि भविष्य-केंद्री बचत दोन्ही शोधणाऱ्या कुटुंबांसाठी ही एक व्यावहारिक निवड बनते.
हे अनावरण अविवाची आर्थिक समावेशनाप्रती वाढती वचनबद्धता प्रतिबिंबित करते – तसेच संरक्षणाची सर्वाधिक आवश्यकता असलेल्या केवळ महानगरांमध्येच नाही तर खऱ्या भारतात पोहोचते.
** प्रत्यक्ष टक्केवारी तपासण्यासाठी अविवा इंडियाची वेबसाइट तपासा
अविवा लाइफ इन्शुरन्सबाबत:
अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड ही डाबर इन्व्हेस्ट कॉर्प आणि अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड या यूकेमधील विमा समूह यांचा संयुक्त उपक्रम आहे. तिचा इतिहास १६९६ पासूनचा आहे. अविवा लाईफ इन्शुरन्स इंडिया नावीन्यपूर्ण विमा उपाय आणि ग्राहककेंद्री उपक्रमांद्वारे आपल्या ग्राहकांचे आर्थिक कल्याण वाढवण्यासाठी समर्पित आहे.


