Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा दिनांक 16 जुलै 2025 ते 26 जुलै 2025 या कालावधीत संपन्न होणार आहेत. आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी 17 वर्षाखालील मुलींच्या गटाने स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक आयुक्त माननीय श्री पंकज पाटील (क्रीडा विभाग) क्रीडा अधिकारी श्री रंगराव कारंडे ,क्रीडापर्यवेक्षक समन्वयक श्री दीपक कन्हेरे स्पर्धाप्रमुख व क्रीडा पर्यवेक्षक श्री बाळाराम शिंदे, तसेच क्रीडा पर्यवेक्षक श्री सुनील ओहाळ यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी क्रीडा समन्वयक सौ ऐश्वर्या साठे, क्रीडा शिक्षक श्री विजय लोंढे श्री दीपक जगताप, सौ वैशाली साळी यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल संत तुकाराम नगर पिंपरी येथे संपन्न झाल्या, या स्पर्धेकरिता पंचप्रमुख श्री.प्रवीण शिवचंद ठोके यांनी काम पाहिले

आज झालेल्या सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे.

सामना क्र १) पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ताथवडे विजयी विरुद्ध मास्टर माईंड ग्लोबल स्कूल भोसरी गुण १-०, अभिलाषा गुंजकर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची खेळाडू हिने एक गोल नोंदविला.

सामना क्र २) क्रीम्सन अनिशा ग्लोबल स्कूल विजय विरुद्ध विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल १-०, अर्पिता सिंग या खेळाडूने एक गोल नोंदविला.

सामना क्र ३) जी जी इंटरनॅशनल स्कूल विजय विरुद्ध जय हिंद हायस्कूल हायस्कूल पिंपरी १-०, आदिती पाटील हिने एक गोल नोंदविला.

सामना क्र.४) एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूल चिखली विजय विरुद्ध डॉक्टर डी वाय पाटील स्कूल पिंपरी. ३–२, एस. एन. बी. पी. चिखली स्कूल कडून आर्या आल्हाट, दिव्यांका देशमुख,

निशिका विजय वर्गीय यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला तर डी वाय पाटील पब्लिक स्कूल कडून अनिशा शर्मा व आस्था ठाकरे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

सामना क्र.५) अभिषेक विद्यालयम विजयी विरुद्ध ग्लोबल आर्ची वर्स स्कूल १-० प्रज्ञा सागळे हिने १ गोल नोंदविला,

सामना क्र.६) सेंट ज्यूड हायस्कूल देहूरोड विजयविरुद्ध नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल २-०, रिदा शेख व समृद्धी भोसले प्रत्येकी एक गोल नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments