Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमसाले, वेग आणि दर्जा : चायनीज वॉकने भारतातील सर्वात मोठे देसी चायनीज...

मसाले, वेग आणि दर्जा : चायनीज वॉकने भारतातील सर्वात मोठे देसी चायनीज क्यूएसआर म्हणून 10 वर्षे पूर्ण करतानाच विस्तार योजना जाहीर केली

भारताच्या बदलत्या चवीला देसी चायनीजची सवय लावण्याच्या दशकाचे औचित्य साधण्यासाठी एका नवीन प्रतीकाचे अनावरण

 

· भारतातील सर्वात मोठ्या देसी चायनीज क्यूएसआरची 240 स्टोअर्स; आर्थिक वर्ष 27 पर्यंत 500 आऊटलेटचे लक्ष्य

 

· भारतातील चायनीज पदार्थांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा, सर्वात वेगाने वाढणारा, सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेला आणि महत्त्वाचे घरगुती क्यूएसआर ब्रँड म्हणून स्थान मजबूत करत नेतृत्व सिद्ध करतो.

 

17th जुलै, 2025, मुंबई: भारतातील सर्वात मोठी घरगुती देसी चायनीज कंपनी, चायनीज वोक देशातील आपल्या दहा वर्षांच्या यशस्वी कामगिरीचा उत्सव साजरा करते आहे. आवडत्या फ्यूजन पाककृतीचा आनंद लोकांना देणारी हि कंपनी आपल्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना आनंदी आहे. 2015 मध्ये असलेल्या अवघ्या एकाच दुकानापासून आता 35+ शहरांमध्ये 240+ स्टोअर्स पर्यंतचा हा प्रवास आहे. जागतिक स्तरावरील क्यूएसआर दिग्गजांचे बाजारपेठेवर वर्चस्व असताना, चायनीज वोकने स्थानिक चवीचा आणि दर्जेदार ब्रँड तयार केला, जो देसी चायनीजला नवीन रूप देतो. यामुळेच भारतातील विकसित होत असलेल्या क्यूएसआर लँडस्केपमध्ये एक प्रभावी शक्ती म्हणून हा ब्रँड उदयास आला आहे.

 

गेल्या दशकात, ब्रँडने ग्राहकांच्या सवयींचा, त्यांच्या आवडी निवडींचा सखोल अभ्यास करत त्याप्रमाणे आपले निर्णय घेतले. मग ते मेनू ठरवणे असो, स्टोअरची रचना असो किंवा प्रादेशिक विस्तार असो. अलीकडेच कोलकातामध्ये अनेक स्टोअर्स सुरू करत त्यांनी पूर्व भारतात आपली पावले भक्कमपणे रोवली आहेत. त्याच बरोबर महानगरांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करतानाच चायनीज वोकने टियर 2 आणि टियर 3 बाजारपेठांमध्ये आक्रमकपणे प्रवेश करणे सुरू ठेवले आहे. केवळ 2024-25 मध्ये, ब्रँडने 60 हून अधिक स्टोअर्स सुरू केली असून आर्थिक वर्ष 27 पर्यंत 500 आउटलेट गाठण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

 

चायनीज वोकच्या विस्तारामुळे भारतातील खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडला आहे. यातला महत्त्वाचा बदल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या परिचित परंतु जागतिक स्तरावर उपलब्ध फॉरमॅट्सची वाढती मागणी. देसी चायनीज श्रेणीतील एक स्वदेशी नेतृत्व म्हणून हा ब्रँड भारतीय क्यूएसआर नवोपक्रमाचा नवीन चेहरा दाखवतो.

 

“हा महत्त्वपूर्ण टप्पा केवळ संख्येबद्दल नाही, तर सांस्कृतिक प्रभाव आणि उत्तम गुणवत्तेच्या आधारावर हा घरगुती ब्रँड स्पर्धात्मक QSR लँडस्केपमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो आणि जागतिक स्तरावर भारतीय QSR ब्रँडसाठी बेंचमार्क स्थापित करू शकतो. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि त्यापलीकडे देशी चायनीजची पुनर्परिभाषा करणारे पुढचे दशक असेल,” असे लेनेक्सिस फूडवर्क्सचे संस्थापक आणि संचालक आयुष मधुसूदन अग्रवाल म्हणाले.

 

या निमित्ताने, कंपनीने 10 वर्षांच्या वर्धापनदिनासाठी लोगो लाँच केला आहे, जे कंपनीच्या धाडसाचे, वाढीचे आणि भारतातील ग्राहकांसाठी देसी चायनीज पुनर्परिभाषित करण्यावर सतत लक्ष केंद्रित करण्याचे प्रतीक आहे. वर्धापन दिन मोहिमेदरम्यान स्टोअर्स, पॅकेजिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा नवीन लोगो दिसेल.

 

आपल्या 10 वर्षांच्या प्रवासाचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, चायनीज वोकने मर्यादित-आवृत्तीच्या ऑफर्स आणि विशेष फूड फिल्म्सपासून ते सोशल मीडियावरील स्पर्धा तसेच स्टोअरमधील उत्सवांपर्यंत 10 उपक्रम राबवले. “सेलिब्रेटिंग 10 वोक्टॅस्टिक इयर्स” या खेळकर थीम अंतर्गत हे सर्व एकत्रित केले आहे.

 

COCO-नेतृत्वाखालील या मॉडेलने सातत्य आणि एकनिष्ठता, सतत वाढणाऱ्या ग्राहक पाठबळासह, चायनीज वोक आपल्या दुसऱ्या दशकात प्रवेश करत आहे. यात केवळ देसी चायनीज श्रेणीचे नेतृत्व करण्याचे ध्येय नाही तर नावीन्यपूर्ण पद्धती, श्रेणी नेतृत्व आणि सखोल ग्राहक सहभागाद्वारे भारत आणि त्यापलीकडे स्वदेशी QSR काय साध्य करू शकतो हे पुन्हा परिभाषित करण्याचे ध्येय आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments