Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअरटेल ने पर्प्लेक्सीटी सोबत भागीदारी केली, आपल्या प्रत्येकी 360 मिलियन ग्राहकास पर्प्लेक्सिटी...

एअरटेल ने पर्प्लेक्सीटी सोबत भागीदारी केली, आपल्या प्रत्येकी 360 मिलियन ग्राहकास पर्प्लेक्सिटी प्रो द्वारे सबल करत आहे या टूलचे वार्षिक सबस्क्रिप्शन *रु. 17000 किंमतीचे आहे, एअरटेल ग्राहकांसाठी ते मोफत आहे

नवी दिल्ली, 17 जुलै, 2025 : भारती एअरटेल आणि पर्प्लेक्सीटी यांनी भागीदारी केली आहे जेणेकरून आपल्या सर्व 360 मिलियन ग्राहकांना 12 महिन्यांचे पर्प्लेक्सीटी प्रो सब्सक्रिप्शन मोफत देता येईल.

 

पर्प्लेक्सीटी हे एआय-संचालित शोध करता येणारे आणि उत्तर देणारे इंजिन आहे जे वापरकर्त्यांना एका संभाषणात्मक भाषेत वास्तविक काळातील, अचूक आणि सखोल संशोधन केलेले प्रतिसाद प्रदान करते. वेब पृष्ठांचे लिस्टिंग ते वाचण्यास सुलभ उत्तरापर्यंत, हे ग्राहकांच्या शोधचा स्तर उंचावते. स्वयं शिकता येणारे एआय-टूल वापरुन हे पुनःपुन्हा केले जाऊ शकते जेणेकरून वापरकर्त्यास आवश्यक असलेले अचूक परिणाम मिळू शकतील.

 

पर्प्लेक्सीटी शक्तिशाली शोध कार्ये प्रदान करणारे एक मोफत ऑफर देऊ करत आहे, तर प्रो आवृत्ती व्यावसायिक आणि भरपूर वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी वाढीव क्षमता प्रदान करत आहे. पर्प्लेक्सिटी प्रो मध्ये प्रत्येक वापरकर्त्यामागे अधिक दैनंदिन प्रो शोध, प्रगत एआय मॉडेल्समध्ये प्रवेश (उदाहरणार्थ, जीपीटी 4.1, क्लॉड) आणि विशिष्ट मॉडेल्स निवडण्याची क्षमता, सखोल संशोधन, प्रतिमा निर्मिती, फाइल अपलोड आणि विश्लेषण, तसेच कल्पनांना जिवंत स्वरूप देणारे एक अद्वितीय साधन म्हणजे पर्प्लेक्सिटी लॅब्स सामील आहे. जगभरात एका वर्षासाठी प्रो ची किंमत *रु. 17000 असणार आहे.

 

हे प्रो चे सब्सक्रिप्शन *रु. 17000 किंमतीचे आहे आणि आता एअरटेलच्या सर्व ग्राहकांना (मोबाइल, वाय-फाय आणि डीटीएच) एका वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. हे एका भारतीय टेलिकॉम कंपनीसोबत पर्प्लेक्सीटीची ही पहिलीच भागीदारी चिन्हांकित करत आहे. एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करून सर्व एअरटेल वापरकर्त्यांना या ऑफरचा लाभ उचलता येईल.

 

या भागीदारीबाबत टिप्पणी करताना गोपाल विठ्ठल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले की, ” आम्ही आनंदाने पर्प्लेक्सीटी बरोबर एक खेळ बदळणारी भागीदारी जाहीर करत आहोत आणि त्यायोगे एयरटेल ग्राहकांसाठी त्यांच्या अत्याधुनिक एआय क्षमता प्रदान करत आहोत. लाखो वापरकर्त्यांना शक्तिशाली आणि वास्तविक काळातील ज्ञानाचे साधन, या सहयोगामुळे चुटकीसरशी उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. भारतातील या पहिल्या प्रकारच्या जेन-एआय भागीदारीने, आपल्या ग्राहकांना डिजिटल जगातील उदयोन्मुख कल आत्मविश्वासाने आणि सहजतेने पार करण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”

 

अरविंद श्रीनिवास – सहसंस्थापक, सीईओ – पर्प्लेक्सीटी म्हणाले, ” ही भागीदारी भारतातील अधिक लोकांसाठी अचूक, विश्वासार्ह आणि व्यावसायिक दर्जाच्या एआय मध्ये प्रवेश करण्याचा एक रोमांचक मार्ग आहे – मग ते विद्यार्थी असोत, काम करणारा व्यावसायिक असोत किंवा घर चालविणे असो. पर्प्लेक्सीटी प्रो वापरून वापरकर्त्यांना माहिती शोधण्याचा, शिकण्याचा आणि अधिक गोष्टी करण्याचा एक स्मार्ट, सोपा मार्ग उपलब्ध होत आहे.”

 

या खेळ बदलणाऱ्या भागीदारीच्या शक्तीचे उदाहरण देता यावे म्हणून राजकोटमधील एका विद्यार्थ्याचे उदाहरण घेऊया. पर्प्लेक्सिटी प्रो वेबवरील वैध संशोधनाची प्रक्रिया, शिक्षण आणि सहयोगाची प्रक्रिया प्रदान करू शकते आणि तर्कशुद्ध व समजण्यास सोप्या पद्धतीने सामग्रीचे आयोजन करण्यात मदत करू शकते. त्यायोगे विद्यार्थ्याला शैक्षणिक उत्कृष्टतेचे मानक टिकवून ठेवण्यात मदत करते. कन्याकुमारीमध्ये राहणाऱ्या गृहिणीसाठी, पर्प्लेक्सीटी सहाय्यक म्हणून काम करून दैनंदिन कामांसाठी जलद व नेमके प्रतिसाद देते, कल्पकतेसाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याकरिता प्रोत्साहन देते: हे सर्व एका वापरकर्ता अनुकूल इंटरफेस द्वारे करते. नवीन स्थळी कुटुंबाला सहलीला घेऊन जाण्याची इच्छा असलेल्या पण कामात व्यस्त असलेल्या एका व्यावसायिकासाठी, पर्प्लेक्सीटी प्रो वापरकर्त्याने दिलेली वेळ, निश्चित बजेट्स आणि अनिवार्य उपक्रम यांच्यावर अवलंबून राहून काही सेकंदातच प्रवासाची योजना तयार करू शकते. वापरकर्त्यांसाठी उत्पादक क्षमता वाढणे, आणि ताण कमी होणे असा लाभ आहे जो एखाद्याला टूल वापरल्यानंतरच समजू शकतो.

 

 

*ग्राहक लाभ हे 1 वर्षासाठी वैध पर्प्लेक्सीटी प्रो एआय च्या चालू सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. अटी व

शर्ती लागू.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments