*”मुख्यमंत्री सहकार मंत्री तसेच सहकार आयुक्तालयाकडून गंभीर दखल तत्काळ कारवाईचे आदेश जारी. अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांची मागणी*
*पुणे दिनांक १७ जुलै २०२५*
*सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कष्टकरी कामगारांच्या लेखी तक्रारी संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने सोलापूर जिल्ह्यातील सहा ते माळशिरस अकलूज येथील सात पतसंस्था, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह एक नागरी सहकारी बँक अकलूज अशा सहा-सात बँकां व पतसंस्थाच्या विरुद्ध माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य, व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे लेखी पुराव्यासह तक्रार दाखल केलेले आहे, सहकार आयुक्त व विभागीय आयुक्त यांना दिलेले निवेदनात पडले आहे की सदर बाबत 15 दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर संबंधितांविरुद्ध सक्षम न्यायालयात मागितली जाईल असा इशारा देखील विठ्ठलाचे पवार यांनी दिला आहे, ते म्हणाले की सदर बाबत माननीय मुख्यमंत्री तथागृहमंत्री यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात जवळपास 1000 पानाचे पुरावे देण्यात आलेले आहेत त्यात दोन लेखापरीक्षकांचे अहवाल देखील सादर करण्यात आलेले आहेत, सदर बाबत संबंधित पतसंस्था व सोलापूर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कायदा आम्हाला लागून असल्याचे सांगितल्याचे रेकॉर्डिंग सहकार आयुक्त, व विभागीय आयुक्त यांना ऐकवले आहेत, अशी माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार (माजी नागरी सहकारी बँका पतसंस्था ठेवी, कर्जदार समितीचे सदस्य.) यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.*
*
*विठ्ठल राजे पवार यांनी सहकार आयुक्त कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की सदरचे प्रकरण 2001 2002 पासून सुरू असून सुमारे 500 ते 1000 बोगस सभासद करून त्यांना बोगस कर्ज वाटप केलेल आहे सदरचे कर्ज वाटप मधील सर्व रक्कम ही एका मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवले असून त्यामधून एका राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून प्रचंड महागोटाळा घडलेला असून सदर गोठळ्याची अंमलबजावणी संचालनालय किंवा निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत एसीबी चौकशीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे सदरचे प्रकरण हे मनीलियन प्रकरणे असून पतसंस्थांमध्ये साधारण पाचशे ते पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांनी म्हटले आहे सदर बाबत सर्व उडावे व दोन लेखापरीक्षकांचे अहवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केलेल्या तक्रारी अर्जात संदर्भात म्हटले आहे सदरची बाब अत्यंत गंभीर असून पतसंस्थांच्या गैर व्यवहारांमध्ये एका कर्मचाऱ्यांनी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात विष प्रशासन करून आत्महत्या केली तर एका बँक पतसंस्था कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप जाणीवपूर्वक केल्याच्या नंतर धक्का बसलेल्या कर्मचाऱ्याला दवाखान्यात ऍडमिट केले असता त्याला डॉक्टरच्या मध्यस्थीने इंजेक्शन देऊन त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सदरबाबतचे पुरावे जमा करण्याचे काम चालू असून संबंधित सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अकलूज येथील सहा ते सात पतसंस्थेच्या माध्यमातून घडलेलं असल्याचे पुरावे जमा करण्याचे काम संघटनेच्या वतीने सुरू असून लवकरच माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन पुन्हा समक्ष सर्व पुरावे सादर करणार असल्याचे विठ्ठल राजे पवार त्यांनी यावेळी सांगितले आहे, यावेळी त्यांनी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांनाही निवेदन दिल्याची माहिती दिली आहे, यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रसिध्दी प्रमुख भाग्यवंत नायकुडे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख तथा सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मगर तसेच श्री गिरीश शिंदे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष महेश गिरी, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय पोंदे पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.*


