बंगलोर, २१ जुलै, २०२५: भारतातील युवा पिढीचा सर्वात लोकप्रिय फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या “पर्वत की समुद्रकिनारे” या वादामध्ये उतरून अगदी सहजपणे आपला निर्णय नोंदवला आहे. फास्ट्रॅकने नवे ओशनिक्स कलेक्शन प्रस्तुत केले आहे, समुद्रापासून प्रेरित होऊन तयार केलेली ही घड्याळे अशांसाठी तयार केली आहेत जे समिट्सच्या ऐवजी लाटा आणि स्ट्रक्चरच्या ऐवजी प्रवाह निवडतात. समुद्राचा ताजातवाना करणारा लहरीपणा दर्शवणारे ओशनिक्स अशांसाठी डिझाईन करण्यात आले आहे, ज्यांना समुद्रासारखा ओघ असतो, तर कधी शांत, निवांत असतात आणि समुद्राप्रमाणेच कायम हेलकावे घेत असतात. ताजीतवानी वृत्ती, लहरीपणा आणि अगदी सहजपणे शांत, निवांत राहण्याचा स्वभाव या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश या कलेक्शनमध्ये करण्यात आला आहे.
ओशनिक्स कलेक्शनची रचना आणि त्यातील भावना यांची प्रेरणा समुद्रापासून घेण्यात आली आहे. लाटांच्या टेक्श्चरच्या डायल्स, मरीन रंगछटा असलेले सिरॅमिक स्ट्रॅप्स आणि व्हेलच्या पंखाच्या आकाराचा सेकंद काटा पाण्याखालच्या जगाची खोली आणि तेथील जीवनाच्या हालचाली यामध्ये प्रतिबिंबित होतात. समुद्राची ऊर्जा आणि व्यक्तिगत अभिव्यक्ती यांचा मिलाप असलेले जग या अभियानात दर्शवण्यात आले आहे – एका अशा समुदायाला आमंत्रित करण्यात आले आहे ज्याचा स्वतःचा एक ओघ आहे, जो तरल आहे आणि समुद्राच्या हाकेला लगेच प्रतिसाद देतो. कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, लाटा नेहमीच बोलवत असतात.
फास्ट्रॅकचे मार्केटिंग हेड डॅनी जेकब यांनी सांगितले, “फास्ट्रॅकमध्ये गोष्टींना आपले बनवणे म्हणजे त्यांना धाडसी, प्रासंगिक आणि कधीही जास्त अंदाज न लावता येण्याजोगे बनवणे असते. पर्वत की समुद्रकिनारे हा वाद नेहमीच मजेदार असतो पण यावेळी समुद्र जिंकला आहे. कधी याला उधाण आलेले असते तर कधी हा निवांत असतो, आणि बहुतांश वेळा तो लहरी असतो. ओशनिक्समध्ये देखील हीच ऊर्जा आहे. हे कलेक्शन अशा लोकांसाठी बनवले गेले आहे जे लाटांबरोबर चालतात, प्रवाहासोबत वाहत जातात आणि नेहमी स्वतःची एक वेगळी ऊर्जा घेऊन येतात – शांत आणि पूर्णपणे गोंधळाच्या परिस्थितीत देखील.”
३,७९५ रुपयांपासून ९,७९५ रुपयांपर्यंतच्या किमतीचे हे कलेक्शन बोल्ड आहे, समुद्रापासून प्रेरणा घेऊन तयार केलेली स्टाईल थेट तुमच्या मनगटावर घेऊन येते आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पसंतीचे काही न काही नक्कीच आहे. फास्ट्रॅक स्टोर्स, ऑनलाईन fastrack.in टायटन वर्ल्ड आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर हे उपलब्ध आहे.


