मुंबई, २१ जुलै २०२५: आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड (एबीएसएलएएमसी)ची स्थापना १९९४ मध्ये झाली. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाईफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट्स आयएनसी. हे कंपनीचे प्रवर्तक आणि प्रमुख समभागधारक आहेत. एबीएसएलएएमसी हे प्रामुख्याने आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे गुंतवणूक व्यवस्थापक असून भारतीय विश्वस्त कायदा, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत ट्रस्ट आहे. मालमत्ता व्यवस्थापकाने दोन नवीन युनिटवर-आधारित इंडेक्स फंड्स- आदित्य बिर्ला सन लाईफ बीएसई ५०० मोमेंटम ५० इंडेक्स फंड आणि आदित्य बिर्ला सन लाईफ बीएसई ५०० क्वालिटी ५० इंडेक्स फंड – आणण्याची घोषणा केली आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) २१ जुलै २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुले राहतील.
ही नवीन उत्पादने मालमत्ता व्यवस्थापकाच्या गुंतवणूक ऑफरिंगचा एक धोरणात्मक विस्तार आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना परिमाणात्मक आणि नियमांवर आधारित निर्देशांकांच्या रचनेत विविध समभाग धोरणांमध्ये प्रवेश मिळतो. बीएसई ५०० मोमेंटम ५० इंडेक्स फंडचे उद्दिष्ट बीएसई ५०० मधील ५० उच्च-कार्यक्षमता असलेल्या समभागांमध्ये गुंतवणूक करून बाजाराच्या गतीचा लाभ उठवणे हे आहे. ते प्रत्येक तिमाहीत अत्यंत वेगाने समायोजित केले जातात. ट्रेंडिंग मार्केटमध्ये जास्तीत-जास्त वाढ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि जास्त जोखीम पत्करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी याची रचना करण्यात आली आहे. सर्वाधिक कामगिरी करणारे समभाग आणि विभाग तसेच १२ महिन्यांच्या कालावधीत परतावा रेकॉर्ड असलेल्या स्टॉकमध्ये प्रवेशाचा फायदा होतो. याउलट बीएसई ५०० क्वालिटी ५० इंडेक्स फंड इक्विटीवर जास्त परतावा, कमी आर्थिक लाभ आणि कमी एक्रुअल रेशो असलेल्या आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्थिर कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो. स्थिर ताळेबंद आणि उत्पन्नात कमी अस्थैर्य असलेल्या उच्च दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे तयार केले आहे. हे समभाग शेअर बाजारातील मंदी दरम्यान चांगली कामगिरी करतात आणि वाढीच्या टप्प्यात उत्तम परतावा देतात.
दुहेरी फंड्सच्या अनावरणाबाबत बोलताना आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमण्यम म्हणाले की, “या दुहेरी फंड अनावरणाचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांच्या मुलभूत समभाग पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्णता आणण्यासाठी सक्षम करणे असून बाजार चक्रांमध्ये कामगिरी सिद्ध करणारे पोर्टफोलिओ मिळवून देणे हा आहे. मोमेंटम इंडेक्स बाजाराच्या वेगाने वाढणाऱ्या विभागांमध्ये जास्त परताव्याच्या संधी देतो, तर क्वालिटी इंडेक्स लवचिक कमाई आणि घसरणीविरुद्ध स्थैर्य असलेल्या समभागांवर लक्ष केंद्रित करतो. भारत शाश्वत आर्थिक विकासासाठी सज्ज असल्याने दोन्ही धोरणे दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी वेळेवर आणि पूरक दृष्टिकोन देतात. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूक टप्प्यानुसार, जोखमीच्या क्षमतेनुसार आणि परताव्याच्या अपेक्षांनुसार आधारित फंड किंवा दोन्ही फंडांचे संयोजन निवडू शकतात.”
स्मार्ट बीटा गुंतवणूक धोरण स्वीकारताना दोन्ही फंड कमी किमतीच्या, नो-एंट्री लोडवर किमान एक्झिट लोड स्ट्रक्चरसह आहेत आणि बाजार भांडवलीकरणात संतुलित एक्सपोजर देण्याच्या एबीएसएलएएमसीच्या तत्वज्ञानाशी जुळतात. क्वालिटी इंडेक्स सामान्यतः लार्ज-कॅप स्टॉकसाठी समान ~५०% वाटप राखतो आणि उर्वरित मिड-कॅप व स्मॉल-कॅपमध्ये देतो. जूनमधील पुनर्रचनेनुसार कॅप स्ट्रक्चरमध्ये जलद बदल झाल्यामुळे मोमेंटम इंडेक्स अधिक चपळ झाला आहे आणि त्याचे मिड व स्मॉलकॅपमध्ये एकत्रितपणे ~७०% एक्सपोजर आ
हे.


