Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिर्लोस्कर प्न्युमॅटिकने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल केले जाहीर; एकूण...

किर्लोस्कर प्न्युमॅटिकने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल केले जाहीर; एकूण महसूल २७२ कोटी रुपये, करपूर्व नफा (PBT) ३७ कोटी रुपये नोंदविला

पुणे, भारत – 22 जुलै 2025 : भारतातील एअर, रेफ्रिजरेशन आणि गॅस कॉम्प्रेशन व्यवसायातील आघाडीची कंपनी किर्लोस्कर प्न्युमॅटिक कंपनी लिमिटेड (KPCL) (BSE : 505283, NSE : KIRLPNU) ने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले आहेत.

Q1 FY26 मध्ये कंपनीचा एकूण महसूल ₹280 कोटी (Q1 FY25 मध्ये ₹279.7 कोटी) इतका नोंदविण्यात आला असून, करपूर्व नफा (PBT) ₹36.8 कोटी (Q1 FY25 मध्ये ₹35.9 कोटी) इतका झाला आहे. विक्री आणि नफ्याचे आकडे स्थिर राहिले असले, तरी व्यवसायाने मजबूत कामगिरी कायम ठेवली असून, आगामी तिमाहीत वाढीचा वेग मिळविण्याची तयारी सुरू आहे.

Q1 FY26 मध्ये नवीन ऑर्डर बुकिंग ₹365 कोटींच्या घरात राहिली असून, 1 जुलै 2025 रोजी एकूण प्रलंबित ऑर्डर ₹1,725 कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या तिमाहीत ऑर्डर बुकिंग आणि विक्री यामध्ये घट दिसून आली असून, त्याचे मुख्य कारण जागतिक परिस्थितीतील अनिश्चिततेमुळे काही मोठ्या ऑर्डर अंतिम न होणे हे आहे.

पहिल्या तिमाहीत कंपनीने “Tyche” हा नवा सेमी-हर्मेटिक रिसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर यशस्वीपणे बाजारात आणला आहे. हे प्रोडक्ट खास व्यापारी रेफ्रिजरेशन विभागासाठी डिझाइन करण्यात आले असून, त्यासाठी लागणारी मोटार कंपनीकडून इन-हाउस उत्पादन करण्यात येते, त्यामुळे ग्राहकांना कार्यक्षम सेवा आणि स्पर्धात्मक किंमत मिळण्यास मदत होते.

खर्च कमी करण्याच्या आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन धोरणाचा भाग म्हणून कंपनीने नाशिक येथे नवीन फाउंड्री स्थापन केली आहे. या फाउंड्रीमध्ये ‘लॉस्ट फोम कास्टिंग’ तंत्रज्ञान वापरले गेले असून, ते पर्यावरणपूरक असून, उत्पादन प्रक्रियेत ‘सर्क्युलॅरिटी’वर आधारित आहे.

कंप्रेशन व्यवसाय हा कंपनीच्या एकूण महसुलातील सुमारे 89% वाटा उचलत आहे आणि तोच आमचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत, तसेच एकमेव रिपोर्टिंग सेगमेंट म्हणून कायम आहे.

Q1 FY 2025-26 च्या आर्थिक कामगिरीचा आढावा :

● ऑपरेशन्समधून महसूल ₹272 कोटी इतका नोंदला गेला, जो Q1 FY25 मध्ये ₹275.3 कोटी होता.

● त्यामुळे एकूण उत्पन्न ₹280.2 कोटी झाले, जे Q1 FY25 मध्ये ₹279.7 कोटी होते.

● EBITDA मार्जिन मात्र सुधारत एकूण उत्पन्नाच्या 15.7% वर पोहोचले, जे मागील वर्षी 15.6% होते.

● करपूर्व नफा (PBT) ₹36.8 कोटी (एकूण उत्पन्नाच्या 13.1%) झाला, तर Q1 FY25 मध्ये तो ₹35.9 कोटी (12.8%) होता.

● कर पश्चात नफा (PAT) एकूण उत्पन्नाच्या 10% होता आणि ₹28.1 कोटी नोंदवला गेला, जो Q1 FY25 मध्ये ₹26.9 कोटी (9.6%) होता.

● ऑर्डर बुक 1 जुलै 2025 रोजी सुमारे ₹1,725 कोटींच्या घरात होती, जी 1 एप्रिल 2025 रोजी ₹1,624 कोटी होती.

● प्रति शेअर मूलभूत नफा (Basic EPS) चालू वर्षात वाढून ₹4.33 प्रति शेअर झाला, जो मागील वर्षी ₹4.15 होता.

आम्ही एकत्रित उत्पन्न विवरणपत्र प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये अलीकडेच संपादन केलेली कंपनी सीस्टिम्स अँड कॉम्पोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन कंपनीचे तुलनात्मक वित्तीय तपशील पूर्ण आर्थिक वर्षाचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments