Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्‍कोडा ऑटोने भारतात गाठला ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा ...

स्‍कोडा ऑटोने भारतात गाठला ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्सचा टप्‍पा १७२ शहरांमध्‍ये ३०० ग्राहक टचपॉइण्‍ट्ससह नवीन टप्‍पा गाठला

प्रमुख व्‍यवसाय अत्‍यावश्‍यक: भारतात स्‍कोडा ऑटोच्‍या वाढीसाठी नेटवर्क विस्‍तारीकरण महत्त्वाचे ठरले आहे.
प्रासंगिकतेला चालना: नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये विस्‍तारीकरण, कार्स व सर्विसेसची श्रेणी ग्राहकांना अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न.
विश्वास निर्माण करणे: देशभरात सातत्‍यपूर्ण दर्जासह जलदपणे, स्‍मार्टपणे सर्विस अनुभव मिळण्‍याची खात्री.
सुधारित क्षमता: वाढती सर्विस उपस्थिती दरवर्षाला केंद्रांमध्‍ये ५,५०,००० स्‍कोडा कार्सची सर्विसिंग होण्‍याची खात्री देते.
द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या केंद्रांमध्‍ये वाढ: सध्‍याच्‍या ३०० टचपॉइण्‍ट्समध्‍ये ७५ टक्‍क्‍यांचे योगदान.

मुंबई, जुलै 22, २०२५ – स्‍कोडा ऑटो नवीन स्‍तरावर झेप घेत आहे, जेथे भारतात २५ वर्षांचा वारसा आणि जागतिक स्‍तरावर १३० वर्षे साजरी करत आहे. या महिन्‍या च्‍या सुरूवातीला ब्रँडने २०२५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत आतापर्यंतची सर्वोच्‍च सहामाही विक्री संपादित केली. आणखी एका यशामध्‍ये कंपनीने ३०० ग्राहक टचपॉइण्ट्सचा टप्‍पा पार केला आहे, जेथे भारतातील १७२ शहरांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत आहे. स्‍कोडा ऑटोच्‍या भारतातील विकास धोरणामध्‍ये अद्वितीय ग्राहक अनुभव महत्त्वाचा आहे. झपाट्याने होत असलेल्‍या नेटवर्क विस्‍तारीकरणामधून ही बाब दिसून येते, तसेच प्रबळ गतीसह ब्रँड भारतभरात आपली उपस्थिती दृढ करत आहे.

या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”आमचे वाढते नेटवर्क आमच्‍या उत्‍पादन श्रेणीला ग्राहकांसाठी अधिक सहजसाध्य करते, तसेच देशभरात सातत्‍यपूर्ण दर्जासह स्‍मार्टपणे, गतीशीलपणे सर्विस देते. ‘सहयोगाने विकास आणि ग्राहकांच्‍या जवळ पोहोचणे’ यावर प्रबळ भर देत भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या दीर्घकालीन डीलर सहयोगींनी आमच्‍या विस्‍तारीकरणामध्‍ये मोठे योगदान दिले आहे, तसेच ग्राहक केंद्रित्वाचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड असलेल्‍या नवीन सहयोगी देखील येत आहेत. हे विस्‍तारीकरण भारतातील स्‍कोडा ऑटोचा वारसा दृढ करण्‍याच्‍या, तसेच सुरक्षितता, मूल्‍य आणि मालकीहक्‍क अनुभवाला लाभदायी करण्‍याचे आमचे वचन कायम ठेवण्‍याच्‍या दिशेने पुढाकार आहे.”

कायलॅकसह वारसा कायम

कायलॅक भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या विकासासाठी प्रमुख स्रोत आहे, जेथे ही कार नवीन बाजारपेठांमधील नवीन ग्राहकांवर लक्ष्‍य करते आणि ब्रँडच्‍या नेटवर्क विस्‍तारीकरणासह या बाजारपेठांमधील गरजांची पूर्तता केली जात आहे. कुशक व कोडियकसह स्‍कोडा ऑटो इंडियाकडे आता प्रत्‍येकासाठी एसयूव्‍ही आहे. स्‍लाव्हियाने स्‍कोडा ऑटोचा भारतातील सेदान वारसा कायम ठेवला आहे, तसेच लवकरच देशामध्‍ये जागतिक आयकॉन लॉंच करण्‍यात येणार आहे. वाढते नेटवर्क भारतातील स्‍कोडा ऑटोच्‍या उत्‍पादन धोरणाशी संलग्‍न आहे.

विकासाच्‍या दिशेने वाटचाल

स्‍कोडा ऑटो इंडियाचे प्रथम श्रेणीच्‍या बाजारपेठांमध्‍ये सखोल प्रवेश करण्‍याचे आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमध्‍ये अधिक विस्‍तार करण्‍याचे विकास धोरण आहे. या धोरणाशी बांधील राहत गेल्‍या नऊ महिन्‍यांमध्‍ये ब्रँडने ३० नवीन शहरांमध्‍ये प्रवेश केला आहे, जे सर्व द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमध्‍ये आहेत, तसेच विद्यमान प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे. याव्‍यतिरिक्‍त या कालावधीत ८६ टक्‍के विस्‍तारीकरण द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या भौगोकि क्षेत्रांमध्‍ये झाले आहे आणि ३०० टचपॉइण्‍ट्सपैकी ७५ टक्‍के टचपॉइण्‍ट्स या शहरांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतात. यामुळे ग्राहकांना सहजपणे विक्री व सर्विस सपोर्ट मिळतो, जवळच्‍या डिलरशिप किंवा सर्विस सुविधेकडे जाण्‍यासाठी लागणारा प्रवास वेळ कमी होतो आणि ग्राहकांना सतत उत्तम दर्जाची खात्री मिळते.

स्‍कोडा खरेदी करणे

आपले नेटवर्क विस्‍तारित करत आणि टचपॉइण्‍ट्सची संख्‍या वाढवत ग्राहकांच्‍या जवळ पोहोचण्‍याच्‍या कंपनीच्‍या प्रयत्‍नाला वॉरंटी, मेन्‍टेनन्‍स आणि रोडसाइड असिस्‍टण्‍स पॅकेजेसचे पाठबळ मिळाले आहे, ज्‍यामधून ग्राहकांना स्‍कोडासह दर्जात्‍मक मालकीहक्‍क व मेन्‍टेनन्‍स अनुभवाची खात्री मिळते. याव्‍यतिरिक्‍त, स्‍कोडा ऑटो इंडिया प्रत्‍येक स्‍कोडा कारवर कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी म्‍हणून एक वर्षाच्‍या कालावधीसाठी स्‍कोडा सुपरकेअर मेन्‍टेनन्‍स पॅकेज देते. यासह स्‍कोडा वेईकलच्‍या मालकाला रूटिन सर्विससाठी मालकीहक्‍काच्‍या दुसऱ्या वर्षाच्‍या शेवटी किंवा ३०,००० किमीनंतर (जे अगोदर असेल ते) पहिला खर्च होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments