Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedफोर्स मोटर्सने आर्थिक वर्ष २५-२६ च्‍या पहिल्‍या तिमाहीत उत्तम कामगिरी दर्शवली; ३५७...

फोर्स मोटर्सने आर्थिक वर्ष २५-२६ च्‍या पहिल्‍या तिमाहीत उत्तम कामगिरी दर्शवली; ३५७ कोटी रूपये ईबीआयटीडीएची नोंद ईबीआयटीडीएमध्‍ये वार्षिक ३५% टक्‍क्‍यांची वाढ

पुणे, २४ जुलै २०२५: फोर्स मोटर्स लिमिटेड ही प्रमुख ऑटोमोटिव्‍ह कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या व्‍हॅन उत्‍पादक कंपनीने ३० जून २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी (आर्थिक वर्ष २०२५-२६ ची पहिली तिमाही) आपल्‍या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे. कंपनीने महसूलामध्‍ये मोठी वाढ, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि देशांतर्गत प्रबळ मागणी या आधारावर उत्तम कामगिरी केली आहे.

ठळक आर्थिक वैशिष्‍ट्ये (आर्थिक वर्ष २०२५-२६ ची पहिली तिमाही):

l कार्यसंचालनांमधून महसूल: २३२२ कोटी रूपये, २२% वार्षिक टक्‍क्‍यांची वाढ

l ईबीआयटीडीए: ३५७ कोटी रूपये, वार्षिक ३५% टक्‍क्‍यांची वाढ

l करपूर्व नफा (पीबीटी): २८७ कोटी रूपये, वार्षिक ५४% टक्‍क्‍यांची वाढ

l करोत्तर नफा (पीएटी): आर्थिक वर्ष २०२४ च्‍या पहिल्या तिमाहीमधील १८५ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ५५ कोटी रूपये

l एकूण कर्ज: शून्‍य

कार्यसंचालनांसंदर्भात वैशिष्‍ट्ये:

l अर्बेनिया, ट्रॅव्‍हलर व ट्रॅक्‍स अशा प्रमुख मॉडेल्‍ससाठी प्रबळ मागणीमुळे देशांतर्गत विक्री आकारमान २६% टक्‍क्‍यांनी वाढले.

l कंपनीवर कोणतेही थकित कर्ज नाही, ज्‍यामधून त्‍यांचे काटेकोर आर्थिक व्‍यवस्‍थापन दिसून येते.

कंपनीच्‍या या कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत फोर्स मोटर्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्‍हणाले, ”आम्हाला नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आनंद होत आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आमचे सातत्यपूर्ण लक्ष, देशांतर्गत गतीचा फायदा घेणे आणि अंतर्गत कार्यक्षमता सुधारणे यांमुळे ही वाढ शक्‍य झाली आहे. आमच्या ग्राहकांचा सततचा विश्वास आणि आमच्या टीमने केलेले अथक प्रयत्‍न या यशासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील सकारात्मक निर्देशकांसह येत्या तिमाहीत वाढ टिकवून ठेवण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. नाविन्‍यता, विश्वासार्हता आणि आमच्या डीलर नेटवर्कचा विस्तार यामधील गुंतवणूक आमची बाजारपेठेतील स्थिती आणखी मजबूत करेल.”

भविष्याकडे वाटचाल करत फोर्स मोटर्स सर्वोत्तम दर्जाचे मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यासाठी, उत्पादन उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी आणि बाजारपेठेच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद म्हणून आपल्‍या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये स्थिर वाढ करण्यासाठी कटिबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments