Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedयामाहा एफझेड-एक्स हायब्रिड बाइक बाजारात

यामाहा एफझेड-एक्स हायब्रिड बाइक बाजारात

पुणे, २५ जुलै २०२५ : इंडिया यामाहा मोटरने लोकप्रिय बाइक एफझेड-एक्सचे नवीन २०२५ हायब्रीड मॉडेल बाजारात आणले आहे. या बाईकमध्ये हायब्रीड इंजिन टेक्नॉलॉजी, कलर टीएफटी मीटर आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम यासारख्या उच्च प्रतीच्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही बाईक मॅट टायटन रंगात उपलब्ध असून तिची किंमत १,४९,९९० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

हायब्रीड इंजिन टेक्नॉलॉजीयुक्त असणाऱ्या एफझेड-एक्समध्ये स्मार्ट मोटर जनरेटर आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टमचा समावेश आहे. क्लच दाबताच इंजिन आपोआप पुन्हा सुरू होते. वाय-कनेक्ट ॲपद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट होण्याची सुविधा आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये १४९ सीसी एअर-कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन असून फोर स्ट्रोक, एसओएचसी टू व्हॉल्व प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन कमाल १२.४ पीएसची ऊर्जा ७२५० आरपीएमवर तर १३.३ एनएमचा टॉर्क ५५०० आरपीएमवर मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments