पुणे : संत नामदेव यांचे नाव उलटे वाचले तर नावातच वदेमना आहे. वदेमनाः म्हणजे मनाने किंवा चांगले बोलूया. पांडुरंगाजवळ पोहोचण्याचा राजमार्ग म्हणजे संत नामदेव महाराज यांचे विचार आहेत, असे मत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सहअध्यक्ष ह. भ. प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केली.
श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था पश्चिम विभाग, कोथरूड संस्थेचे अध्यक्ष दिलीप वायचळ यांच्या पुढाकाराने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. कर्वेनगर येथील गोल्डन लीप बँक्वेट हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्र कलुगुरू पराग काळकर, प्रति शिर्डी शिरगावचे अध्यक्ष प्रकाश देवळे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, पुणे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेविका मोनिका मोहोळ, नासप पुणे शहराध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला भजनी मंडळाच्यावतीने भारूड, भजन सादर करण्यात आले. यावेळी महिला संबळ वादक गौरी वनारसे वायचळ यांनी देखील वादन केले. सोहळ्यात संस्थेच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष भारत चुंबळकर, उपसचिव पंकज सुत्रावे, सुनील बारटक्के, हरीश पानसरे, संजय बारटक्के, वंदना कोर्टीकर, ॲड. स्मिता महेंद्रकर, नविता खोडके, वर्षा बगाडे, किशोर सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आशिष जराड व आभार सचिव निरगुडे यांनी मानले.


