Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedरूबी हॉल क्लिनिक वानवडी तर्फे रूग्ण व कर्मचाऱ्यांसाठी समर्पित जैन किचन* ...

रूबी हॉल क्लिनिक वानवडी तर्फे रूग्ण व कर्मचाऱ्यांसाठी समर्पित जैन किचन* *_रूग्ण व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या आहाराबाबतच्या श्रद्धांचा आदर करण्याच्या हेतूने सात्विक आहार सेवा_*

*पुणे,28 जुलै 2025* : आरोग्य सेवेला अध्यात्मिक संवेदनशीलतेशी जोडणाऱ्या हृदयस्पर्शी उपक्रमात रूबी हॉल क्लिनिक वानवडीच्या वतीने मेडिजैनच्या सहकार्याने पुण्यातील पहिले समर्पित जैन किचनचे उद्घाटन करण्यात आले. ही सुविधा सात्विक आहार पाळणाऱ्या रूग्ण कर्मचारी व भेट देणाऱ्यांसाठी ताजे तयार केलेले सात्विक आहार प्रदान करेल. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन परमपूज्य क्रांतिकारी विचारक,प्रवचन प्रभावक,अध्यात्मक चिंतक मुनिराज श्री जयप्रभा विजयजीपूज्य महाराज साहेबजी (जे पी गुरूदेव) यांच्यासह रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.संतोष शिंदे आणि डॉ.परवेज ग्रांट यांच्या उपस्थितीत झाले.

हे समर्पित किचन केवळ खाद्यपदार्थ तयार करण्याची जागा नसून आपण सेवा देत असलेल्या समुदायांच्या मूल्यांचा,श्रध्दांचा आणि जीवनशैलीचा आदर करण्याची रूग्णालयाची वचनबध्दता दर्शविते. विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह वेगळी भांडी वापरून समर्पित किचनमध्ये तयार केलेल्या या आहारात मुळांच्या भाज्या,कांदा,लसूण आणि जैन आहार तत्वज्ञानाच्या विरूध्द जाणारे कोणतेही घटक पूर्णपणे वगळले जातात. स्त्रोतापासून ते वाढण्यापर्यंत प्रत्येक घटक अध्यात्मिक पावित्र्य,स्वच्छता आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी डिझाईन केली गेली आहे.

सात्विक अन्नाची भूमिका केवळ शारीरिक पुनर्प्राप्तीचीच नाही तर भावनिक सुसंवाद आणि अध्यात्मिक उन्नतीला देखील प्रोत्साहन देणारी आहे.करूणा आणि शुध्दतेमध्ये रूजलेले पोषण हे चांगल्या आरोग्यासाठी पायाभूत आहे आणि आहिंसा आणि जागरूक जीवनाच्या तत्त्वांशी अखंडपणे जुळते.

रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट, अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की, उपचार हे औषधापलीकडे जातात,या संस्थेच्या विश्वासाचे हे स्वयंपाकघर हे प्रतिबिंब आहे.आम्हाला हे माहित आहे की,अनेकांसाठी अन्न हे त्यांच्या श्रध्देचे एक पवित्र अभिव्यक्ती आहे.अशा मुल्यांचा आदर करणारे आहार प्रदान करून आम्ही केवळ पुनर्प्राप्तीच नव्हे तर रूग्णांच्या जीवनाच्या मूल्यांचा आदर करत आहोत.

रूबी हॉल क्लिनिक वानवडीचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.संतोष शिंदे म्हणाले की, हा उपक्रम दीर्घकालीन पोकळी भरून काढणारा आहे.आमच्याकडे अनेक जैन रूग्ण आणि कर्मचारी आहेत,ज्यांना रूग्णालयात वास्तव्य दरम्यान आहारात तडजोड करावी लागायची.हे स्वयंपाकघर तत्त्वांपासून दूर न जाता बरे होऊ शकतात.मेडिजेनच्या पाठिंब्याने आम्ही या दृष्टीकोनाचे वास्तव्यात रूपांतर केले आहे.

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी म्हणाले की,आम्ही नेहमीच यावर विश्वास ठेवला आहे की,उपचार हा केवळ शरीराचाच नव्हे तर आम्ही ज्यांची सेवा करत आहोत त्यांच्या विश्वासांचा आदर करतो.आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की, आम्ही रूबी हॉल क्लिनिक वानवडी येथे समर्पित जैन किचन सुरू करत आहोत,जे सर्वसमावेशक रूग्ण केंद्रित सेवा आणि नीतिमत्तेचे प्रतिबिंब आहे.

रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ.सायमन ग्रांट म्हणाले की,आरोग्यसेवेचे भविष्य हे करूणायुक्त नवोपक्रमात आहे,असा आम्हाला नेहमीच विश्वास वाटतो.आमच्या प्रवासात पुढे जाताना आम्ही ज्या समुदायांना सेवा देत आहोत त्या सेवांमध्ये त्यांच्या मुल्यांचे प्रतिबिंब असणे अधिक महत्त्वाचे ठरेल.हे केवळ आहाराच्या पसंतीबाबत नसून रूग्णालयात रूग्णांना त्यांची प्रत्येक अर्थाने काळजी घेतल्याचा अनुभव निर्माण करणाऱ्या संस्कृतीबद्दल आहे.

उद्घाटन समारंभात जैन समुदायामधील सदस्य,हॉस्पिटलचे कर्मचारी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.अत्याधुनिक आरोग्यसेवा परिसंस्थेत श्रध्दा आणि अन्न एकत्रीकृत करण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचा समारोप शुध्द जैन जेवणाने झाला.

रूबी हॉल क्लिनिक वानवडीने मेडिजैन सोबतच्या या सहकार्याद्वारे केवळ एक स्वयंपाकघर सुरू केले नाही तर काळजी घेण्याचा अर्थ पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक ठोस पाऊल उचलले आहे.रूग्णांचे ऐकणारी,आदर करणारी आणि करूणामय आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments