Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedरागा बाय टायटनने आपले प्रमुख वितरक सीटी पुंडोळे अँड सन्ससोबत पुण्यामध्ये प्रस्तुत...

रागा बाय टायटनने आपले प्रमुख वितरक सीटी पुंडोळे अँड सन्ससोबत पुण्यामध्ये प्रस्तुत केले नवे ‘कॉकटेल्स’ कलेक्शन

पुणे, २8 जुलै, २०२५: आधुनिक महिलांसाठी तयार केलेल्या शानदार घड्याळांसाठी नावाजला जाणारा ब्रँड, रागा बाय टायटनने आपले नवे ‘कॉकटेल्स’ कलेक्शन आज पुण्यात दाखल केले. असिलो, द वेस्टइनमध्ये यासाठी एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता.

आत्मविश्वासू, निडर आणि फॅशनविषयी चोखंदळ असलेल्या महिलांसाठी खास निवडण्यात आलेल्या स्टेटमेंट घड्याळांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले होते. यातील प्रत्येक घड्याळामध्ये कालातीत शान आणि आधुनिकता यांचा सुरेख मिलाप आहे, सर्वांचे लक्ष कायम ज्यांच्याकडे खिळून असते अशा महिलांसाठी ही घड्याळे सर्वोत्तम आहेत.

नॅशनल सेल्स हेड, मल्टी ब्रँड रिटेल श्री राहुल पांडे, रीजनल बिझनेस मॅनेजर, मल्टी ब्रँड रिटेल श्री संजीव रंजन, सीटी पुंडोळे अँड सन्सचे संचालक श्री कावस पुंडोळे आणि होर्मूझ व अविवा पुंडोळे हे पुण्यातील रागाचे प्रमुख वितरण हितधारक यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे टायटनची या क्षेत्राप्रती व स्टाइलच्या बाबतीत विशेष जागरूक असलेल्या येथील महिलांप्रती मजबूत बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

इन्फ्ल्यूएंसर अनुजा यांनी फॅशन आणि समुदाय यांना एकत्र आणत, पाहुण्यांना स्टाईलमध्ये #StirUpTheNight करण्यासाठी आमंत्रित करत या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments