दिल्ली, भारत, 28 जुलै 2025: कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड (KEL) ने संपूर्ण नवीन कायनेटिक डीएक्स ईव्हीच्या लॉन्चसह दुचाकी बाजारात आपल्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. ही नवीन मेड-इन-इंडिया मॉडेल श्रेणी कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लि. (KWV) या त्यांच्या ईव्ही उत्पादनास समर्पित कंपनीद्वारे तयार करण्यात आली आहे. नाविन्यपूर्णता, व्यावहारिकता आणि उत्कृष्ट रूप असलेली, अनेक पिढ्यांनी वाखाणलेली DX आता एका प्रगत इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात पुनरागमन करत आहे. ज्यामध्ये त्यांचे लोकप्रिय डिझाईन आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा सुमेळ साधण्यात आला आहे. या स्कूटरचा मूळ DNA अबाधित ठेवण्यासाठी इटालियन डिझाईर्सच्या सोबतीने आकर्षक डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हे एक खरेखुरे कौटुंबिक वाहन बनले आहे.
या सेगमेन्टमध्ये प्रथमच दाखल केलेली फीचर्स
ईझी की:
त्रास-मुक्त की-लेस संचालनासाठी
ईझी चार्ज (DX+ वर):
कायनेटिकची पेटंट असलेली रिट्रॅक्टेबल चार्जिंग केबल, ज्यामुळे चार्जिंग सोयिस्कर आणि सहज होते
ईझी फ्लिप:
अतिरिक्त सुविधेसाठी वन-टच पिलियन फूटरेस्टची मांडणी.
स्पेसिफिकेशन्स
मजबूत मेटल बॉडी आणि ऐसपैस फ्लोरबोर्डसह या नवीन कायनेटिक डीएक्स ईव्हीने आपल्या मूळ डिझाईनशी साधर्म्य राखले आहे. या विभागात सीटखालील सर्वात मोठे ३७+लीटरचे स्टोरेज यात आहे. ज्यामध्ये एक संपूर्ण आणि एक अर्धे हेल्मेट तसेच खालील बाजूस असलेल्या छोट्या छोट्या खणांमुळे काही दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देखील राहू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे रेंज-X ने बनवलेली २.६ किलोव्हॅटच्या महत्तम क्षमतेची एलएफपी बॅटरी, जिचे जीवनमान भारतातील इतर एनएमसी बॅटरी-संचालित स्कूटर्सच्या तुलनेत ४ पटींपर्यंत (2500 ते 3500+ चक्रे) जास्त आहे. त्यामुळे अधिक चांगल्या थर्मल संवेदनशीलतेसह हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. ही बॅटरी DX+ वर 116 किमी ची IDC रेंज देईल, असे अनुमान आहे, कारण यात महत्तम कार्यक्षमतेसाठी K-कोस्ट रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि एक 60Vची सिस्टम आहे. यामध्ये एक दमदार मोटर देखील आहे, जी 3 मोड्स (रेंज, पॉवर, टर्बो) सह ताशी 90 किमी वेगापर्यंतची गती देण्यास सक्षम आहे.
कायनेटिक डीएक्स आणि डीएक्स+ या दोन्ही मॉडेल्समध्ये रिव्हर्स आणि हिल होल्ड फीचर्स आहेत. फ्रंट टेलिस्कोपिक आणि समयोजित करण्याजोग्या रियर शॉक अब्जॉर्बर्स द्वारा या गाडीला आरामदायकता बहाल करण्यात आली आहे, तर, कॉम्बी ब्रेकिंगसह, २२० मिमी फ्रंट डिस्क आणि १३० मिमी रियर ड्रम ब्रेक द्वारे सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
DX EVच्या मागील व्हिजनविषयी बोलताना कायनेटिक इंडियाचे उपाध्यक्ष श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “90च्या दशकात कायनेटिक DX ने इतक्या नवीन गोष्टी दिल्या होत्या, की त्या गाडीने लक्षावधी लोकांच्या मनात कायमी स्थान मिळवले. ह्या प्रसिद्ध गाडीचे पुनरुज्जीवन करताना आम्ही केवळ एक स्कूटर लॉन्च केलेली नाही, तर ती विश्वासार्हता, नावीन्यपूर्णता आणि मजबुती देखील पुन्हा सादर केली आहे, जी पूर्वीपासून कायनेटिकची ओळख आहे. मात्र यावेळी त्यात एक भविष्य-उन्मुख चैतन्य आहे. नवीन DX च्या माध्यमातून आम्ही अनेक सेगमेन्ट-फर्स्ट फीचर्स दाखल केली आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, ही फीचर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नवीन युगात या गाडीला लोकप्रिय बनवतील. कायनेटिकसाठी आणि भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या उत्क्रांतीत ही एका धाडसी नव्या अध्यायाची सुरुवात आहे.
कायनेटिक DX EV रेंज सोबत एक समर्पित मोबाइल अॅप येते, तर DX+ हे व्हेरियन्ट प्रगत टेलीकायनेटिक फीचर्ससह चालकाचा अनुभव अधिक उन्नत करते. या फीचर्समध्ये रियल-टाइम राईडची आकडेवारी आणि वाहनाचा डेटा, जिओ फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे. माय कायनी कम्पॅनियन व्हॉईस अलर्ट्स सह या स्कूटरला एक व्यक्तिमत्व बहाल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ही स्कूटर चालकाला भेटते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सुरक्षितता आणि स्कूटरच्या कार्यांबाबत जागरूक देखील करते. या दोन्ही व्हेरियन्टमध्ये ब्लूटुथ मार्फत तत्काळ CRM कनेक्टसाठी एक समर्पित कायनेटिक असिस्ट स्विच आहे. इतर ब्लूटुथ सक्षम फीचर्समध्ये बिल्ट-इन स्पीकर सह म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशनचा समावेश आहे.
या गाडीचे बुकिंग 35000 गाड्यांपर्यंतच मर्यादित आहे आणि डिलिव्हरी येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. ग्राहक www.kineticev.in ला भेट देऊन 1000 रु. भरून आपली DX बुक करू शकतात. कायनेटिक DX ची किंमत 1,11,499 रु. आहे, तर कायनेटिक DX+ ची किंमत 1,17,499 रु. आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम, पुणे आहेत). DX+ पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे- लाल, निळा, सफेद, सिल्व्हर आणि काळा. DX व्हेरियन्ट सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
कायनेटिक वॉट्स आणि व्होल्ट्सला KEL आणि प्रमोटर्सकडून आधीच 72 कोटी रु. चे भांडवल मिळाले आहे. आपली अढळ वचनबद्धता दर्शवत प्रमोटर्सनी अलीकडेच KEL मध्ये अतिरिक्त 177 कोटी रु. च्या गुंतवणुकीचा संकल्प केला आहे, ज्याचा एक मोठा हिस्सा DX प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी समर्पित आहे.
—————————————————————————–
कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सविषयी
सप्टेंबर 2022 मध्ये स्थापित कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स (KWV) ही अजिंक्य फिरोदिया यांचे नेतृत्व लाभलेली, कायनेटिक इंजिनियरिंग लि. ची एक साहाय्यक समर्पित इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) उत्पादन कंपनी आहे. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातील कायनेटिकचा महान वारसा पुढे नेत, KWV नावीन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि टिकाऊ EV सोल्यूशन्सचे सर्जन करण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे.
87000 चौरस फुट जागेत पसरलेली ही अत्याधुनिक उत्पादन सुविधा स्केलेबल आणि ईको-फ्रेंडली उत्पादनासाठी डिझाईन करण्यात आली असून KWV अत्याधुनिक ऑटोमेशन आणि प्रगत गुणवत्ता प्रणालीला फायदा करून घेते. यामधून आमची सुरक्षित, उच्च-परफॉर्मन्स देणारी आणि या उद्योगासाठी नवीन मापदंड स्थापन करणारी, खऱ्या अर्थाने मेड-इन-इंडिया EV उत्पादने प्रदान करण्याची अढळ वचनबद्धता दिसून येते.
कायनेटिक इंडिया विषयी
कायनेटिक इंडिया ही भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे, जी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या कायनेटिक लूना आणि कायनेटिक DX सादर करण्याबद्दल ओळखली जाते. ही क्रांतिकारी मॉडेल्स घराघरात पोहोचली होती आणि एका संपूर्ण पिढीसाठी शहरी गतीशीलतेचा पर्याय बनली होती. या गाड्यांनी कायनेटिकला इनोव्हेशन आणि विश्वासाचे प्रतीक बनवले.
50 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी स्व. श्री. H K फिरोदिया द्वारा स्थापित आणि पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांचे नेतृत्व लाभलेल्या कायनेटिक समूहाने आपल्या कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड या महत्त्वाच्या कंपनीच्या माध्यमातून इंजिनियरिंग उत्कृष्टता आणि व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादनाच्या बाबतीत सतत नवीन मापदंड स्थापित केले आहेत. आज हा समृद्ध वारसा पुढे नेत कायनेटिक ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आधुनिक सोल्यूशन्स प्रदान करून कायनेटिक गतीशीलतेचे भवितव्य घडवण्याचे काम करत आहे.
भारताच्या गतीशीलतेच्या क्षेत्रात पारदर्शकता, वृद्धी आणि नेतृत्त्वाबाबत आपली वचनबद्धता अधोरेखित करणारी कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध (BSE: 500240) आहे.


