● भारतात रौप्यमहोत्सवी उत्पादन प्रवासाचा उत्सव
● भारतात २०३० पर्यंत विविध उत्पादन क्षेत्रांमध्ये ३००००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट
राष्ट्रीय, २९ जुलै २०२५: डिकॅथलॉन या जागतिक आघाडीच्या मल्टी-स्पेशालिस्ट स्पोर्ट्स ब्रँडने आज देशातील उत्पादन प्रवासाचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना, २०३० पर्यंत भारतातून स्थानिक खरेदी ३ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे धोरणात्मक लक्ष्य जाहीर केले. हे ध्येय कंपनीच्या “मेक इन इंडिया” दूरदर्शितेसाठी वाढती वचनबद्धता आणि देशांतर्गत व जागतिक बाजारपेठांना सेवा देण्यासाठी स्थानिक उत्पादन क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची इच्छाशक्ती अधोरेखित करते.
सध्या डेकॅथलॉनच्या जागतिक खरेदीच्या प्रमाणात भारताचा वाटा ८% असून २०३० पर्यंत तो १५% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ही वाढ भारतीय ग्राहकांच्या आणि जागतिक बाजारपेठांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या फूटवेअर, फिटनेस उपकरणे आणि टेक्निकल टेक्स्टाइल अशा प्रचंड विक्री होणाऱ्या श्रेणींमध्ये लक्ष केंद्रित करून पूर्ण केली जाईल.
या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना डिकॅथलॉन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर चॅटर्जी म्हणाले: “मागील २५ वर्षांपासून भारतातील आमचा उत्पादन प्रवास देशातील डिकॅथलॉनच्या यशाचा कणा राहिला आहे. आमच्या स्थानिक उत्पादन परिसंस्थेची उत्तम गुणवत्ता, विश्वासार्हता आणि वेग यामुळे आम्हाला रिटेलमध्ये मोठा विस्तार करणे शक्य झाले आहे. शहराच्या केंद्रांपासून ते मॉलपर्यंत आणि त्यापलीकडे आम्ही जाऊ शकलो आहोत. आज आम्ही भारतीय क्रीडाक्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करणाऱ्या मेड इन इंडिया श्रेणींचा वैविध्यपूर्ण आणि वाढता पोर्टफोलिओ ऑफर करण्यास सक्षम आहोत. ऑफलाइन आणि विविध प्लॅटफॉर्मवर आमचा ठसा मजबूत करत असताना उत्पादनातील सर्वोत्तमता आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. ती व्यवसायातील शाश्वत वाढ आणि प्रत्येक भारतीयाला खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरते.”
स्थानिक पातळीवर डिकॅथलॉनची स्थानिक उत्पादन आधीपासूनच सुरू आहे. २०२५ मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या ७०% पेक्षा जास्त प्रमाणात उत्पादने भारतातच बनवली जात होती. २०३० पर्यंत हा आकडा ९०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ब्रँडचे स्थानिक सोर्सिंग धोरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
ही वाढ डिकॅथलॉनच्या मजबूत स्थानिक उत्पादन परिसंस्थेवर आधारित आहे. त्यात नावीन्यपूर्णता आणि वाजवी दरांवर लक्ष केंद्रित करणारे डिझाइन सेंटर समाविष्ट असून संपूर्ण भारतातील ११३ उत्पादन केंद्रे, ८३ पुरवठादार आणि ७ उत्पादन कार्यालये सहाय्यभूत ठरतात. कंपनी योग आणि क्रिकेट अशा सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या खेळांवर देखील आपले लक्ष केंद्रित करत असून क्रिकेटसाठीची उत्पादने तर भारतात संकल्पना तसेच उत्पादन केली जात आहेत.
या वाढीच्या प्रवासाचा एक भाग म्हणून डिकॅथलॉन उत्पादन परिसंस्थेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात ३,००,००० हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे डिकॅथलॉनचा स्थानिक प्रभाव वाढेल आणि भविष्यासाठी तयार पुरवठा साखळी आणि कच्च्या मालाच्या – घटक आणि तयार वस्तूंच्या मूल्य साखळीत भर पडेल.
डिकॅथलॉन प्रॉडक्शन प्रमुख फ्रेडरिक मेरलेवेडे म्हणाले: “भारत डिकॅथलॉनच्या जागतिक उत्पादन परिसंस्थेचा एक आधारस्तंभ बनला आहे – केवळ प्रमाणाच्या बाबतीतच नाही तर गुणवत्ता, नावीन्य आणि गती प्रदान करण्याच्या क्षमतेतही. भारतातील आमची दीर्घकालीन गुंतवणूक आमच्या भागीदारांसोबत निर्माण केलेल्या सखोल विश्वासाचे आणि फूटवेअर, फिटनेस उपकरणे व त्यापलीकडे असलेल्या प्रमुख श्रेणींमध्ये आम्हाला दिसणारी क्षमता प्रतिबिंबित करते. आमच्या विकासासोबत आमची महत्त्वाकांक्षाही स्पष्ट आहे: भारताला डिकॅथलॉनच्या आघाडीच्या जागतिक उत्पादन केंद्रांपैकी एक बनवणे आणि मूल्य, शाश्वतता आणि मोठ्या प्रमाणात परिणाम साध्य करणे.”
डिकॅथलॉन इंडिया प्रॉडक्शनचे प्रमुख दीपक डिसूझा म्हणाले: “भारतात उत्पादनाचा रौप्यमहोत्सव साजरा करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या मॉडेलच्या केंद्रस्थानी एक मजबूत, विभाजित उत्पादन परिसंस्था आहे जी आम्हाला सातत्यपूर्ण गुणवत्ता, वेग आणि व्याप्ती देण्यास सक्षम करते. आमचा प्रवास आमच्या भागीदारांसोबतच्या सहकार्याने आणि आमच्या कार्यक्षम लोकांच्या – तंत्रज्ञांपासून ते कारखाना युनिटपर्यंत- ताकदीने आकाराला आला आहे – कारण हेच लोक दररोज उत्कृष्टतेचे नेतृत्व करतात. आम्ही भविष्याकडे पाहत असताना नवसंशोधनाला गती देण्यावर, स्मार्ट उत्पादन चालविण्यावर आणि शाश्वत उपायांना पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करू. आम्ही फक्त भारतात उत्पादने तयार करत नाही आहोत – आम्ही भारत आणि जगासाठी भारतात बनवलेल्या खेळाचे भविष्य घडवत आहोत.”
डेकॅथलॉनची भारतातील ५५ शहरांमध्ये १३२ स्टोअर्स आहेत. भविष्याकडे पाहता कंपनीची रणनीती क्षमता आणि व्याप्ती दोन्ही वाढविण्यावर आधारित आहे. त्यात विविध श्रेणी-नेतृत्वाखालील वाढ आणि रिटेल उत्पादनावर भर दिला जाईल. याचाच एक भाग म्हणून डिकॅथलॉन २०३० पर्यंत ९० हून अधिक शहरांमध्ये आपली रिटेल विक्री वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते.
________________________________________
डिकॅथलॉनबाबत
नवशिक्या आणि अव्वल खेळाडूंना सेवा देणारा जागतिक मल्टीस्पेशालिटी क्रीडा ब्रँड, डिकॅथलॉन हा सर्व कौशल्यांसाठी क्रीडा वस्तूंचा एक नावीन्यपूर्ण निर्माता आहे. जगभरात १,००,००० हून अधिक सहकाऱ्यांसह आणि १,७०० स्टोअर्ससह, डिकॅथलॉन आणि त्यांचे समूह १९७६ पासून सातत्यपूर्ण महत्त्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत: लोकांना खेळाच्या आनंद देणे, त्यांना निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करणे.
डिकॅथलॉनकडून ‘मेक इन इंडिया’च्या व्याप्तीत वाढ; पुढील ५ वर्षांत ३ अब्ज डॉलर्सच्या स्थानिक खरेदीचे लक्ष्य
RELATED ARTICLES


