पुणे : काळ बदलत आहे त्याच सोबत सूर आणि ताल देखील बदलत आहेत परंतु संगीताचा मूळ पाया बदलला नाही. ज्या व्यक्तीचे ताल आणि सुरांवर प्रभुत्व असते त्याचे जीवन सुंदर आणि संगीतमय होते. नृत्य आणि गायन म्हणजे आनंदाचा परमोच्च क्षण आहे, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्कार गायक जितेंद्र भुरुक यांना माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, विश्वेश्वर बँकेचे अनिल गाडवे, नाट्यपरिषद अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अनुबंध सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष अथर्व जाधव यावेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
जितेंद्र भुरुक म्हणाले, स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या नावाने आणि उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. यापुढेही रसिकांना संगीत सेवा देत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘याद ए रफी’ हिंदी गाण्यांचा झाला. गायिका राजेश्वरी पवार, अशोक जाधव आणि जितेंद्र भुरुक यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.
Regards,


