Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएन ग्रुपच्या न्यूट्रिका ब्रँडची ‘न्यूट्रिका बी हनी’ सह मध क्षेत्रात दमदार एंट्री

बीएन ग्रुपच्या न्यूट्रिका ब्रँडची ‘न्यूट्रिका बी हनी’ सह मध क्षेत्रात दमदार एंट्री

पुणे: बीएन होल्डिंग्स लिमिटेड या ९,००० रुपये कोटींच्या बीएन ग्रुपच्या प्रमुख कंपनीद्वारे सुरू झालेला लाइफस्टाइल आणि वेलनेस ब्रँड न्यूट्रिका आता ‘न्यूट्रिका बी हनी’ लाँच करत मधाच्या श्रेणीत प्रवेश करत आहे. ही नवीन रेंज ऊर्जा, फिटनेस आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी खास डिझाइन केलेल्या तीन प्रकारांत उपलब्ध असून सध्या दिल्ली एनसीआर आणि मुंबईतील किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

आजच्या घडीला आरोग्याविषयी जागरूकता वेगाने वाढत आहे. अशा वेळेस न्यूट्रिका कडून मध या पारंपरिक सुपरफूडमध्ये केलेला प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आधीपासूनच आरोग्यदृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले स्वयंपाकाचे तेल साठी ओळख असलेला हा ब्रँड, आता भारतीय आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या मधाच्या स्वरूपात आपली आरोग्यदायी वचनबद्धता आणखी विस्तारत आहे. ‘न्यूट्रिका बी हनी’ ही रेंज आजच्या आरोग्यप्रेमी, सक्रिय कुटुंबांसाठी खास तयार करण्यात आली आहे.

‘न्यूट्रिका बी हनी’ तीन उद्देश्यपूर्ण प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: प्रो-एनर्जी मल्टिफ्लोरा हनी – विविध फुलांपासून मिळालेल्या परागरसामूळे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स व पोषकद्रव्यांनी परिपूर्ण, संपूर्ण दिवसभरासाठी ऊर्जा देणारे मध. प्रो-फिटनेस लिंबू मिश्रित हनी – लिंबाचा ताजेपणा आणि मधाची गोडी यांचे संगम, पचनक्रिया, चयापचय (metabolism) व वजन नियंत्रणात मदत. प्रो-इम्युनिटी तुळस मिश्रित हनी – तुळशीच्या औषधी गुणधर्मांनी युक्त, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे व सर्दी-खोकल्यावर उपयोगी.

या सर्व प्रकारांमध्ये कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा साखर घालण्यात आलेली नाही. हे मध नैसर्गिक फुलांच्या समृद्ध भागांतून मिळवले जाते आणि शुद्धतेसाठी कठोर तपासणी केली जाते. ‘बिल्डिंग नेशन’ या तत्त्वज्ञानाशी निष्ठा राखत, न्यूट्रिका प्रत्येक बाटलीद्वारे शुद्ध व उद्देश्यपूर्ण पोषण पोहोचवत आहे.

न्यूट्रिका चे फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स विभाग प्रमुख स्पर्श सचर म्हणाले, “न्यूट्रिका बी हनी हा केवळ एक नवीन उत्पादन नाही, तर तो आमच्या तत्त्वज्ञानाचा विस्तार आहे. पारंपरिकतेतून प्रेरणा घेत नवकल्पना करणारी उत्पादने तयार करत आम्ही न्यूट्रिका ब्रँड उभा केला आहे. आजच्या बदलत्या आरोग्यदायी जीवनशैली साठी सुसंगत असा हा नैसर्गिक आणि उत्तम पर्याय आहे.” ही लाँचिंग न्यूट्रिका च्या फंक्शन-फर्स्ट पोर्टफोलिओचा भाग आहे, ज्यामध्ये आधीपासूनच व्हिटॅमिन C-युक्त कुकिंग ऑइल्सचा समावेश आहे.

बीएन ग्रुपचे संस्थापक अनुभव अग्रवाल यांनी आरोग्यवर्धक जीवनशैलीला चालना देणाऱ्या उच्च दर्जाच्या उत्पादकतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. उत्तम गुणवत्तेचा मध सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा न्यूट्रिका चा उद्देश आहे – त्यासाठी त्यांनी प्रीमियम असूनही परवडणारी किंमत धोरण आखले आहे. ही घोषणा न्यूट्रिका च्या नैसर्गिक आणि फंक्शनल फूड स्पेसमधील विस्ताराचे एक महत्त्वाचे पाऊल ठरते, ज्या अंतर्गत ब्रँड रोजच्या जीवनशैलीत आरोग्यवर्धक बदल घडवू इच्छितो.

न्यूट्रिका बद्दल थोडक्यात:

न्यूट्रिका हा बीएन होल्डिंग्स लिमिटेड अंतर्गत असलेला एक अग्रगण्य खाद्यतेल ब्रँड आहे. विविध कुटुंबांच्या आरोग्य आणि चवीनुसार तयार केलेले पोषणयुक्त खाद्यतेल हे त्यांच्या तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या उच्च निकषांनुसार विकसित केले गेले आहे. न्यूट्रिका चा उद्देश आहे – भारतीय कुटुंबांचे आरोग्य पुनर्कल्पित करणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments