चेन्नई, १ ऑगस्ट २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने १०० अत्याधुनिक मॅग्ना ईव्ही इंटरसिटी कोचेसचा पुरवठा करण्यासाठी युनिव्हर्सल बस सर्विसेस (यूबीएस)चे पाठबळ असलेली इलेक्ट्रिक गतीशीलता शाखा ग्रीन एनर्जी मोबिलिटी सोल्यूशन्स प्रा. लि. (जीईएमएस) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पॅसेंजर वेईकल एक्स्पो २.० मध्ये हा करार करण्यात आला, जेथे टाटा मोटर्स त्यांचे नवीन व्यावसायिक प्रवासी गतीशीलता सोल्यूशन्स दाखवत आहेत, ज्यामध्ये ऑल-इलेक्ट्रिक मॅग्ना ईव्ही आणि एलपीओ १८२२ चा समावेश आहे. या वेईकल्स उच्च दर्जाची कार्यक्षमता, प्रवासी आरामदायीपणा आणि दर्जात्मक एकूण मालकीहक्क खर्चासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.
युनिव्हर्सल बस सर्विसेस दक्षिण भारतातील प्रख्यात प्रीमियम इंटरसिटी ट्रॅव्हल ब्रँड आहे. हा ब्रँड नाविन्यता, विश्वसनीयता आणि ग्राहक-केंद्रित सेवांसाठी ओळखला जातो. त्यांची नवीन स्थापना करण्यात आलेली ईव्ही शाखा ग्रीन एनर्जी मोबिलिटी सोल्यूशन्स प्रगत इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग पायाभूत सुविधा तैनात करत यूएसबीच्या शाश्वत गतीशीलतेप्रती परिवर्तनाला गती देत आहे. तामिळनाडू सरकारचे माननीय उद्योग मंत्री डॉ. टी.आर.बी. राजा, तामिळनाडू सरकारचे प्रतिनिधी आणि ऑल ओम्नी बस ओनर्स असोसिएशन (एओबीओए)च्या सदस्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
तामिळनाडू सरकारचे माननीय उद्योग मंत्री डॉ. टी.आर.बी. राजा म्हणाले, ”तामिळनाडू ऑटोमोटिव्ह आणि शुद्ध गतिशीलता नाविन्यतेमध्ये आघाडीवर आहे. इंटरसिटी इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्यासाठी टाटा मोटर्सचा युनिव्हर्सल बस सर्विसेससोबतचा सहयोग अधिक पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाचा तामिळनाडूमधील नागरिकांना फायदा होतो, जेथे त्यांना शुद्ध प्रवास पर्याय मिळतील. या उपक्रमामधून भविष्यासाठी सुसज्ज, शाश्वत वाहतूक परिसंस्था निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होते.”
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत युनिव्हर्सल बस सर्विसेसचे व्यवस्थापकीय सहयोगी आणि ग्रीन एनर्जी मोबिलिटी सोल्यूशन्सचे संचालक श्री. सुनिल कुमार रविंद्रन म्हणाले, ”टाटा मोटर्ससोबतचा आमचा दीर्घकालीन सहयोग विश्वासावर करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार म्हणजे महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जेथे आम्ही मॅग्ना ईव्ही कोचेससह इलेक्ट्रिक इंटरसिटी प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. या बसेस शांत, अधिक आरामदायी प्रवास आणि उत्साहवर्धक प्रवासी अनुभवाची खात्री देतात, ज्या लांब अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी परिपूर्ण आहेत. कमी कार्यसंचालन खर्च व शून्य उत्सर्जनासह हा ताफा आमची कार्यक्षमता वाढवेल, तसेच शाश्वत गतीशीलतेप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ देखील करेल.”
या सहयोगाच्या महत्त्वाबाबत सांगत टाटा मोटर्सच्या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्हणाले, ”यूबीएससोबतचा हा सामंजस्य करार आतंरशहरीय परिवहनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण क्षण आहे. ग्राहकांकडून अभिप्राय आणि प्रखर चाचणीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली मॅग्ना ईव्ही भारतात लांब अंतरापर्यंतच्या प्रवासाला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की ही वेईकल आरामदायीपणा, कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये नवीन मापदंड स्थापित करेल. भारतातील इलेक्ट्रिक मास मोबिलिटी सोल्यूशन्सची आघाडीची प्रदाता टाटा मोटर्स शुद्ध व कनेक्टेड परिवहनाच्या भविष्याला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे.”
टाटा मॅग्ना ईव्ही कोच पूर्णत: इलेक्ट्रिक इंटरसिटी बस आहे, जी सिंगल चार्जमध्ये जवळपास ३०० किमी रेंज देते. या बसमध्ये ४४-आसन सुविधा आहे, जी लांब अंतरापर्यंतच्या प्रवासादरम्यान आरामदायीपणा देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एर्गोनॉमिक सीट्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम (ईबीएस) आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)च्या माध्यमातून प्रवासी सोयीसुविधा व सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
टाटा मोटर्स वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओच्या माध्यमातून भारतातील इलेक्ट्रिक बस विभागामध्ये आघाडीवर आहे. या पोर्टफोलिओमध्ये शहरांतर्गत प्रवासासाठी स्टारबस ईव्ही व अल्ट्रा ईव्ही आणि इंटरसिटी प्रवासासाठी मॅग्ना ईव्हीचा समावेश आहे. ११ शहरांमध्ये कार्यरत असलेल्या ३,६०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेससह या ताफ्याने एकूण ३४ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे, तसेच अपटाइम ९५ टक्क्यांहून अधिक आहे. या बसेस टाटा मोटर्सचा कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजसह सुसज्ज आहेत, जे रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स, देखरेख व फ्लीट ऑप्टिमायझेशन देते.


