Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात स्‍वातंत्र्य दिन साजरा करण्‍यासाठी व्हिजन एआय टीव्‍हीवर 'बिग सेलिब्रेशन, बिगर...

सॅमसंगकडून भारतात स्‍वातंत्र्य दिन साजरा करण्‍यासाठी व्हिजन एआय टीव्‍हीवर ‘बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रिन’ ब्‍लॉकबस्‍टर डिल्‍सची घोषणा

गुरूग्राम, भारत – १ ऑगस्‍ट २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने स्‍वातंत्र्य दिनाचा उत्‍साह साजरा करण्‍यासाठी देशव्‍यापी ‘बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रिन’ मोहिमेची घोषणा केली आहे. ही मोहिम १ ऑगस्‍ट ते ३१ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत रिटेल स्‍टोअर्स आणि ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर राबवण्‍यात येईल, जेथे ग्राहकांना सॅमसंगच्‍या व्हिजन एआय बिग टीव्‍हींवरील आकर्षक डिल्‍ससह मनोरंजन अधिक उत्‍साहवर्धक करण्‍याची संधी आहे. सॅमसंगचे व्हिजन एआय असलेले हे टेलिव्हिजन्‍स उत्‍साहवर्धक व सर्वोत्तम होम एंटरटेन्‍मेंटचा आनंद देतात. या टे‍लिव्हिजन्‍समध्‍ये सर्वोत्तम पिक्‍चर, साऊंड व सानुकूल कन्‍टेन्‍ट आहे, जे वापरकर्त्‍यांच्‍या पसंतीनुसार डिझाइन करण्‍यात आले आहेत.

वर्षानुवर्षे सॅमसंग ग्राहकांसाठी सणासुदीच्‍या काळातील खरेदी उत्‍साहवर्धक करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. प्रमोशनचा भाग म्‍हणून सॅमसंगच्‍या निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी, क्‍यूएलईडी आणि क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍ही श्रेणीमधील निवडक ५५-इंच व त्‍यापेक्षा मोठ्या आकाराचे मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ९३००० रूपये किंमत असलेला साऊंडबार किंवा जवळपास २०५००० रूपये किंमत असलेला टीव्‍ही मोफत मिळेल. या ऑफर्स अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सर्वोत्तम व्‍युइंग आणि अद्वितीय मूल्‍य देण्‍याप्रती सॅमसंगच्‍या सातत्‍यपूर्ण कटिबद्धतेचा भाग आहेत, ज्‍यामुळे कुटुंबांसाठी घरी मोठ्या आकाराचा टीव्‍ही आणण्‍याची ही परिपूर्ण वेळ आहे.

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक व प्रमुख विप्‍लेश डांग म्‍हणाले, ”स्‍वातंत्र्य दिनाला कुटुंबं एकत्र येत उत्‍साहपूर्ण साजरीकणाचा आनंद घेतात, जेथे संपूर्ण भारतात उत्‍साहाचे वातावरण असते. ‘बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रिन’ ऑफर्ससह आमचा हा काळ अधिक उत्‍साहवर्धक करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे कुटुंबांना सॅमसंगच्‍या एआय-पॉवर्ड बिग टीव्‍हींमध्‍ये अपग्रेड करण्‍याची संधी आहे. या टेलिव्हिजन्‍समध्‍ये सर्वोत्तम पिक्‍चर क्‍वॉलिटी, सिनेमॅटिक साऊंड आणि सॅमसंग व्हिजन एआयद्वारे समर्थित सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. आम्‍ही नाविन्‍यतेमध्‍ये बाजारपेठेचे नेतृत्‍व करत असताना आमचे प्रीमियम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्‍य करण्‍याप्रती आणि देशभरातील ग्राहकांसाठी एआय व्‍युइंग अनुभवाचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

अपग्रेडला अधिक किफायतशीर करण्‍यासाठी सॅमसंगने या मोहिमेअंतर्गत प्रबळ फायनान्‍स प्रस्‍ताव सादर केला आहे. ग्राहक निवडक ५५-इंच व त्‍यापेक्षा मोठ्या आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवर फक्‍त २,९९० रूपयांपासून सुरू होणारे सुलभ ईएमआय आणि जवळपास ३० महिन्‍यांपर्यंत दीर्घकालीन योजनांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे तडजोड न करता सहजपणे अपग्रेड करता येईल. तसेच, सॅमसंग विविध बँक सहयोगींकडून जवळपास २० टक्‍के कॅशबॅक, तसेच सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसच्‍या माध्‍यमातून व्‍यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष १० टक्‍के अतिरिक्‍त कॅशबॅक देत आहे.

ग्राहक ऑफर्सच्‍या संपूर्ण श्रेणीचा आनंद घेण्‍यासाठी कोणत्‍याही सॅमसंग रिटेल आऊटलेटमध्‍ये जाऊ शकतात किंवा Samsung.com या वेबसाइटला भेट देऊ शकतात. परेड, ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट पाहण्‍याचा किंवा कुटुंबासोबत उत्‍साहवर्धक क्षणांचा आनंद घ्‍यायचा असो आता साजरीकरणासाठी मोठ्या कारणांसह मोठ्या आकाराचा टीव्‍ही खरेदी करण्‍याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments