Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीव्हीएस क्रेडिटतर्फे वितरणात १२ टक्के वाढीची नोंद, तर करोत्तर नफ्यात २९ टक्के...

टीव्हीएस क्रेडिटतर्फे वितरणात १२ टक्के वाढीची नोंद, तर करोत्तर नफ्यात २९ टक्के वाढ, जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत १८१ रुपयांच्या करोत्तर नफ्याची नोंद

31 जुलै २०२५ – टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या भारतातील आघाडीच्या एनबीएफसीमध्ये समावेश असलेल्या कंपनीने ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत १६९७ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले असून त्यात आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ करोत्तर नफा १८१ कोटी रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. टीव्हीएस क्रेडिटने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत वितरणात १२ टक्के वाढ नोंदवली आहे.

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीची वैशिष्ट्ये

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील एयूएम २६,८९८ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २ टक्क्यांची वाढ
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न १६९७ कोटी रुपये असून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील करपूर्व नफा २४३ कोटी रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील निव्वळ करोत्तर नफा १८१ कोटी रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत टीव्हीएसने ग्राहक वित्तपुरवठ्यात लक्षणीय वाढ नोंदवली असून कंपनीने विविध उत्पादनश्रेणीतील जोखीम व विकासाचे समीकरण कायम राखले आहे. कंपनीने उत्पादन श्रेणी, वितरण, ग्राहक अनुभव व कार्यकालीन क्षमता उंचावत वैविध्यपूर्ण विस्तार केला आहे. या कालावधीत टीव्हीएस क्रेडिटने १६ लाख नव्या ग्राहकांना कर्जाचे वितरण केले असून कंपनीचा एकूण ग्राहकवर्ग आता २ कोटींवर गेला आहे.

टीव्हीएस क्रेडिटद्वारे विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यासाठी बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर, उत्पादन श्रेणी विस्तारण्यावर, डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यावर आणि ग्राहक अनुभव तसेच कार्यकालीन क्षमता विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments