Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedरसान्स कंपनीचा ₹ ४७१ कोटींचा टप्पा पार; तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि कर्मचारी सहभागाच्या...

रसान्स कंपनीचा ₹ ४७१ कोटींचा टप्पा पार; तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि कर्मचारी सहभागाच्या बळावर वाढतेय देशभरात नेटवर्क

चेन्नई, ५ ऑगस्ट २०२५: देशातील सर्वात मोठी स्वदेशी कॉन्ट्रॅक्ट फूड सर्व्हिसेस कंपनी रसान्स प्रायव्हेट लिमिटेडने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी आपले अंतरिम आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने चालू आर्थिक वर्षात 29 टक्के वार्षिक वाढीसह 471 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले असून, या क्षेत्रातील आपली आघाडीची भूमिका कायम राखण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे.

स्पार्क कॅपिटल एआयएफच्या पाठबळावर आणि माजी सीआरसीएलच्या लेव्हरेज्ड बायआऊट आणि पुनर्रचनेतून स्थापन झालेल्या रसान्स प्रायव्हेट लिमिटेडकडून सध्या देशभरातील औद्योगिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट पार्क्समध्ये दररोज 3.25 लाखांहून अधिक जेवणांची वितरण व्यवस्था केली जाते. ही व्यापक व्याप्ती कंपनीच्या एकात्मिक, तंत्रज्ञानावर आधारित आणि कार्यप्रणाली-केंद्रित मॉडेलची ताकद दर्शवते.

वित्तीय वर्ष 2024-25 दरम्यान, रसान्सने उत्तर आणि पश्चिम भारतात आपली उपस्थिती अधिक बळकट केली असून, अखिल भारतीय पातळीवरील विस्ताराला गती दिली आहे. या काळात कंपनीचा EBITDA मार्जिन 3.6% इतका राहिला. याचवेळी, रसान्सने आपल्या महसुलाच्या सुमारे 2% निधी तंत्रज्ञान क्षेत्रातील उपाययोजनांमध्ये, रोबोटिक्स-आधारित प्रक्रिया स्वयंचलन, ईआरपी गव्हर्नन्स सिस्टिम्स आणि कर्मचारी कल्याण यांसारख्या बाबींमध्ये गुंतवला. अल्पकालीन नफ्यावर भर न देता संस्थात्मक सक्षमता आणि दीर्घकालीन शाश्वततेसाठी कंपनीची वचनबद्धता या गुंतवणुकीतून स्पष्टपणे दिसून येते.

“संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये खरेदीपासून ते ग्राहकांपर्यंत- कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे कार्यप्रदर्शनातील उत्कृष्टता हेच आमच्या वाढीच्या धोरणाचे केंद्रबिंदू आहे. यासोबतच आमच्या ग्राहकांशी दीर्घकालीन सुसंगतीही आम्ही कायम राखत आहोत,” असे रसान्सचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सांगितले.

कंपनी व्यावसायिक पद्धतीने चालवली जावी, तंत्रज्ञानाचा पाया भक्कम असावा आणि कर्मचारी कल्याणासाठी सर्वोत्तम पद्धती राबवल्या जाव्यात, याबाबत रसान्स कटिबद्ध असल्याचे कुमार यांनी पुढे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, रसान्स ही जागतिक स्तरावरील ‘बिग फाइव्ह’ ऑडिट फर्मकडून लेखापरीक्षण करण्यात आलेली एकमेव भारतीय अन्नसेवा कंपनी आहे. कंपनीने बीडीओ यांच्यासोबत वैधानिक लेखापरीक्षक म्हणून सातत्याने ठेवलेली भागीदारी ही त्यांच्या सशक्त प्रशासन आणि आर्थिक पारदर्शकतेवरील विश्वास दर्शवते. जीएसटीवरील इनपुट टॅक्स क्रेडिटच्या अभावामुळे अन्नसेवा क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आणि तुकड्यातुकड्यांत विखुरलेली रचना आढळते, अशा पार्श्वभूमीवर ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते.

अनुपालन, डेटा पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर आधारलेली ‘गव्हर्नन्स-प्रथम’ ही आमची कार्यपद्धती राष्ट्रीय स्तरावर विस्तारता येईल असे संस्थान उभारण्याच्या आमच्या उद्दिष्टाचा केंद्रबिंदू आहे,” असे कुमार यांनी पुढे सांगितले.

कंपनीची नेतृत्व संरचना देखील तितकीच प्रगत आहे. रसान्सचे संचालन विविध पार्श्वभूमी असलेल्या कार्यकारी मंडळाकडून केले जाते, ज्यापैकी अनेकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या नवोदित तंत्रज्ञानातील औपचारिक प्रशिक्षण आहे. त्यामुळेच कंपनीच्या डेटा-आधारित कार्यपद्धती आणि निर्णयप्रक्रियांना अधिक बळकटी मिळते.

उद्योग क्षेत्रातील पारंपरिक प्रथांपेक्षा वेगळी भूमिका घेत रसान्सने प्रवर्तकांकडे केंद्रीत असलेल्या मालकी हक्कांच्या पद्धतीला छेद देत एक विशेष शेअर डायल्यूशन कार्यक्रम राबवला आहे. यामार्फत साइट-स्तरीय व्यवस्थापक आणि ऑपरेशन्स प्रमुखांनाही इक्विटीचा वाटा देण्यात आला आहे. पारंपरिक ईएसओपी मॉडेलपेक्षा वेगळा असलेला हा समावेशक दृष्टिकोन कंपनीच्या 4,000 हून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये मालकीची भावना वृद्धिंगत करतो. विशेष म्हणजे, हे सर्व कर्मचारी वेतन यादीत असून त्यांना सर्व कायदेशीर लाभ दिले जातात.

ऑपरेशन्स आणि प्रशासन यापलीकडे जाऊन रसान्स पर्यावरणपूरक जबाबदारीकडेही ठोस पावले टाकत आहे. स्वयंपाकघरातील कचऱ्याचा पुनर्वापर करून विकसित करण्यात आलेल्या कंपोस्टिंग आणि शहरी शेती कार्यक्रमांद्वारे कंपनीने सर्क्युलर फूड सिस्टिम्सकडे जाणारा जाणिवपूर्वक बदल केला आहे. मोठ्या प्रमाणावर सेवा देणाऱ्या अन्न वितरण प्रणाली शाश्वत असायलाच हव्यात, या तत्त्वावर रसान्सचा ठाम विश्वास आहे, हे या उपक्रमांमधून स्पष्ट होते.

आगामी आर्थिक वर्ष 2025-26 कडे पाहताना, रसान्सने 564 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूलाचे लक्ष्य ठरवले असून, विद्यमान ग्राहकांसोबतच नव्या सेवा क्षेत्रांमधूनही वाढ अपेक्षित आहे. कंपनीचा भर जैविक (ऑर्गेनिक) वाढीवर असून, सध्या बाह्य निधी उभारणी किंवा अधिग्रहणाच्या कोणत्याही तातडीच्या योजना नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तंत्रज्ञान, प्रशासन आणि शाश्वततेवर आधारित एकात्मिक मॉडेलच्या जोरावर रसान्स भारतातील विकसित होत असलेल्या अन्नसेवा क्षेत्रात नवे मानदंड स्थापित करत आहे. आगामी वाढीच्या टप्प्यासाठी कंपनी सज्ज झाली असल्याचे दिसून येते.

________________________________

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments