Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राहकांसाठी आँडी कंपनीची अतिरिक्त मूल्यवर्धित सेवा

ग्राहकांसाठी आँडी कंपनीची अतिरिक्त मूल्यवर्धित सेवा

पुणे, ५ ऑगस्‍ट, २०२५: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या सर्वसमावेशक वॉरंटी आणि ऑडी रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्रामची घोषणा केली, जेथे ग्राहकांना त्‍यांच्‍या संपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये उद्योग-अग्रणी १०-वर्ष विस्‍तारित वॉरंटी आणि १५-वर्ष रोडसाइड असिस्‍टन्‍स सेवा देण्‍यात येत आहे. नवीन विस्‍तारित वॉरंटी प्रोग्राम ग्राहकांना वेईकलच्‍या उत्‍पादन तारखेपासून जवळपास १० वर्षांपर्यंत सर्वसमावेशक कव्‍हरेज देतो. विस्‍तारित वॉरंटी मूल्‍यवर्धित पर्याय म्‍हणून उपलब्‍ध आहे. यामुळे ग्राहकांना अपवादात्‍मक अनुभव देण्‍याप्रती आणि भारतातील लक्‍झरी ऑटोमोटिव्‍ह विभागाला प्रगत करण्‍याप्रती ऑडीची सातत्‍यपूर्ण कटिबद्धता अधिक दृढ करतो.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ग्राहकांसोबतचे आमचे नाते वाहन खरेदीनंतरही पुढे देखील कायम राहते. आमचे विस्‍तारित वॉरंटी व ऑडी रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्राम ग्राहक समाधानाप्रती आमच्‍या अविरत कटिबद्धतेचे विस्‍तारीकरण आहेत आणि भारतातील लक्‍झरी ऑटोमोटिव्‍ह सेवेसाठी नवीन उद्योग मानक स्‍थापित करतात. १०-वर्ष विस्‍तारित वॉरंटी आणि १५-वर्ष रोडसाइड असिस्‍टन्‍ससह आमचा ग्राहकांसाठी आगामी फेस्टिव्ह सणांच्या निमित्तानेही फायदेशीर ठरणार आहे.
नवीन विस्‍तारित वॉरंटी प्रोग्राममुळे ग्राहकांना वेईकलच्‍या उत्‍पादन तारखेपासून जवळपास १० वर्षांपर्यंत सर्वसमावेशक कव्‍हरेज मिळते. ग्राहक प्रमाणित उत्‍पादक वॉरंटीशी समान असलेल्‍या कव्‍हरेज अटींसह १-वर्ष आणि २-वर्ष विस्‍तारीकरणामधून निवड करू शकतात. हा प्रोग्राम १० वर्षांपर्यंतच्या वेईकल्‍ससाठी सर्व उत्पादन दोषांना कव्हर करतो. ज्यामध्ये २००,००० किलोमीटरपर्यंत मायलेज संरक्षण आहे. ही वॉरंटी भारतातील सर्व ऑडी उत्पादनांवर उपलब्ध आहे आणि स्थिर खरेदी पर्याय देते, ज्यामुळे ग्राहकांना नवीन कार डिलिव्हरीच्या वेळी किंवा विद्यमान वॉरंटी समाप्‍त होण्‍यापूर्वी कव्हरेज मिळू शकते.
तसेच, ऑडी रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्राम आता अद्वितीय १५-वर्ष रोडसाइड असिस्‍टन्‍स पर्याय देतो. हा प्रोग्राम भारतातील राष्‍ट्रीय महामार्ग, राज्‍य महामार्ग व मुख्‍य शहरांमधील रस्‍त्‍यांवर सर्वसमावेशक २४/७ आपत्‍कालीन रोडसाइड असिस्‍टन्‍स सेवा देतो. रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्राम विविध वैधता कालावधी व वेईकलच्‍या वयानुसार ३,९९९ रूपये ते ८,००० रूपयांपर्यंत स्थिर कव्‍हरेज पर्याय देतो.
विस्‍तारित वॉरंटी कव्‍हरेज:
ठळक वैशिष्‍ट्ये:
जवळपास १० वर्षांपर्यंतच्‍या वेईकल्‍ससाठी सर्व उत्‍पाादन दोष कव्‍हर करण्‍यात येतात.
व्‍यापक मायलेज संरक्षणासह जवळपास २००,००० किलोमीटरपर्यंत कव्‍हरेज.
भारतातील सर्व ऑडी मॉडेल्‍सवर उपलब्‍ध.
नवीन कारची डिलिव्‍हरी करताना किंवा विद्यमान वॉरंटी समाप्‍त होण्‍यापूर्वी निवड करता येऊ शकते.
ऑडी रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्राम:
२४/७ सर्वसमावेशक सेवा:
भारतातील राष्‍ट्रीय महामार्ग, राज्‍य महामार्ग आणि मुख्‍य शहरांमधील रस्‍त्‍यांवर आपत्‍कालीन ब्रेकडाऊन सपोर्ट.
ब्रेकडाऊन, अपघात झाल्‍यास किंवा वेईकल बंद पडल्‍यास जवळच्‍या अधिकृत वर्कशॉपमध्‍ये घेऊन जाण्‍याची सुविधा.
किरकोळ यांत्रिक आणि विद्युत दोषांसाठी त्वरित टेक्निकल सहाय्य.
आपत्कालीन सहाय्य सेवा:
१० लीटर पर्यंत इंधनची डिलिव्‍हरी (इंधन खर्च ग्राहकाने उचलावा)
बॅटरी बूस्ट
टायर दुरुस्ती आणि रिप्‍लेसमेंट
स्पेअर की वितरण आणि लॉकआउट सहाय्य
प्रीमियम कस्‍टमर केअर:
दुरूस्‍तीसाठी ७२ तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्‍यास हॉटेलमध्‍ये राहण्‍याची सुविधा किंवा पुढे/परतीच्‍या प्रवासाची सुविधा (मूळ स्‍थानाापासून १०० किमीपेक्षा अधिक असल्‍यास)
कस्‍टडी, परिवहन आणि वेईकल सुरक्षितता सेवा
विशेष डिझाइन केलेला टोइंग प्‍लॅटफॉर्म
सर्व प्रवाशांसाठी मोफत अल्‍पोपहार
प्रगत सेवा वैशिष्‍ट्ये:
सर्व ब्रेकडाऊन केसेससाठी जवळच्या डीलरशिपला ईमेल सूचना
केसचे निराकरण होईपर्यंत दर ३० मिनिटांनी ग्राहकांना अपडेट्स
सेवेदरम्यान दिल्या जाणाऱ्या संरक्षक बॉडी कव्हर्सचा १०० टक्‍के वापर
समर्पित कस्टडी आणि मोबिलिटी असिस्टन्स
सोयीस्कर प्रवेशासाठी व्हॉट्सअॅप-आधारित सेवा विनंती यंत्रणा
विस्‍तारित वॉरंटी व रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्राम सर्व नवीन ऑडी ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल. विद्यमान ग्राहकांना त्‍यांच्‍या वेईकलचे वय आणि वॉरंटी स्थितीनुसार त्‍यांचे कव्‍हरेज अपग्रेड करण्‍याची संधी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments