पुणे:दि. ७ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी लिखित मूळ ‘हमारा सांस्कृतिक चिंतन’ या हिंदी पुस्तकाचा अनुवादित ग्रंथ ‘मृत्यूंजय भारत’ १३ ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद आरती देवगावकर यांनी केला आहे. मोरया प्रकाशनतर्फे या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन टिळक रस्त्यावरील गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गणेश सभागृहात १३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल.
यावेळी, पुस्तकाचे लेखक भैयाजी जोशी आणि रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव उपस्थित राहतील.नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांनी केले आहे.
‘मृत्यूंजय भारत’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन*
RELATED ARTICLES


