Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रद्धेच्या धाग्यातून विद्यार्थ्यांनी गुंफले रक्षाबंधनाचे नाते तब्बल ६०० विद्यार्थ्यांचे मंडईच्या शारदा गणपतीसोबत...

श्रद्धेच्या धाग्यातून विद्यार्थ्यांनी गुंफले रक्षाबंधनाचे नाते तब्बल ६०० विद्यार्थ्यांचे मंडईच्या शारदा गणपतीसोबत अनोखे रक्षाबंधन साजरे गुजराती शिक्षण प्रचारक मंडळाच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग : सार्वजनिक सेवेबद्दल मेट्रो अधिकाऱ्यांप्रती राखीतून कृतज्ञता व्यक्त

पुणे : बाप्पा, तू माझा भाऊ आहेस…आणि माझ्यासाठी नेहमी माझ्या मागे उभा राहणारा तूच माझा रक्षणकर्ता आहेस असे म्हणत विद्यार्थ्यांनी भक्तीभावाने लाडक्या बाप्पाला ओवाळत राखी बांधली. श्रद्धेच्या धाग्यातून रक्षाबंधनाचे अनोखे नाते विद्यार्थ्यांनी यावेळी गुंफले.

गुजराती शिक्षण प्रचारक मंडळाच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीला पर्यावरण पूरक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यानंतर मेट्रोची सफर करत विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील राखी बांधली. यावेळी आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संस्थेचे अध्यक्ष दीपक मेहता, सचिव बालेश शाह, विश्वस्त योगेश मेहता,
उपाध्यक्ष शैलेश रावल, शाळा समन्वयक जिग्न्या ठक्कर जोशी आणि सर्व विभागप्रमुख यांसह ५०० पालक यावेळी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मंडई ते पिंपरी चिंचवड अशी विनामूल्य मेट्रो सफर केली.

दीपक मेहता म्हणाले, विद्यार्थ्यांनी आज राखी बांधून पर्यावरण रक्षण, सामाजिक बांधिलकी यासोबतच मेट्रोच्या अधिकाऱ्यांना राखी बांधून सार्वजनिक सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य आणि संवेदनशीलता वृद्धिंगत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments