सक्रिय सहभाग नोंदवावा. पीओपी आणि शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन महापालिकेला सहकार्य करावे.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
—
कोट:
गणेशोत्सव काळात विसर्जन व्यवस्थापन अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याच्या दृष्टीने कृत्रिम हौदांची संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. आज झालेल्या बैठकीत विविध स्वयंसेवी संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर देखील भर दिला जाणार आहे.
— संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका


