Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझी प्रचारक यात्रा' पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन*

माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन*

पुणे, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शशिकांत चौथाईवाले यांच्या ‘माझी प्रचारक यात्रा’ या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी आवृत्ती येत्या मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. अशी माहिती माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी दिली
‘माय होम इंडिया’ आणि ‘भारतीय विचार साधना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा प्रकाशन सोहळा सदाशिव पेठेतील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल, तर संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शशिकांत चौथाईवाले गेल्या ६१ वर्षांपासून आसाममध्ये संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. येत्या १४ ऑगस्ट रोजी त्यांचा ८८ वा वाढदिवस असून या प्रकाशन सोहळ्यासोबतच त्यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन दिल्लीतील प्रभात प्रकाशन यांनी केले आहे, तर मराठी अनुवादाचे पुनर्प्रकाशन पुण्यातील भारतीय विचार साधना यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments